आवळा सरबत (Amala Sarbat)

आवळा सरबत (Amala Sarbat)

आवळा सरबत

साहित्य : 1 वाटी आवळ्याचा गर, 2 वाटी (अंदाजे) साखर, थोडी मिरेपूड, थोडा खाण्याचा हिरवा रंग, चवीनुसार मीठ.
कृती : आवळे उकडून त्यातील बिया काढून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आवळ्याचा जेवढा गर असेल त्याच्या दुपटीने (हे प्रमाण आंबटपणा आणि चवीनुसार कमी जास्त करता येईल) त्यात साखर एकत्र करा. साखर घातलेला आवळ्याचा गर मंद आचेवर शिजवून घ्या. नंतर भांडं आचेवरून उतरवून त्यात खाण्याचा हिरवा रंग आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. हे सरबत काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा.

सरबत बनवण्यासाठी : थंड पाण्यात आवश्यकतेनुसार आवळ्याचं सरबत आणि थोडी मिरेपूड घालून व्यवस्थित एकत्र करा. हे सरबत गाळून थंडगार सर्व्ह करा.
लाभ : आवळ्यामध्ये जीवनसत्त्वं आणि उपयुक्त क्षार मुबलक प्रमाणात असतात. तसंच इतर फळांच्या तुलनेत आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतं.
वृद्धांना तारुण्य आणि महिलांना सौंदर्य प्रदान करण्याची अद्भुत क्षमता आवळ्यामध्ये आहे. सुरकुतलेली त्वचा, केस पांढरे होणं या तक्रारी आवळा रसाच्या नियमित सेवनाने दूर होतात.
हृदयविकाराचा झटका रोखण्याचं सामर्थ्य आवळ्यात आहे. आवळ्याच्या रसामुळे डोळ्यांचं तेज वाढतं. स्मरणशक्ती वाढते. अशक्तपणा दूर होतो.