अळशी शेंगदाण्याचे लाडू (Alsi Peanut Ladoo)

अळशी शेंगदाण्याचे लाडू (Alsi Peanut Ladoo)

अळशी शेंगदाण्याचे लाडू

साहित्यः  अर्धा कप अळशी, 1 कप भाजलेले शेंगदाणे, 2 कप किसलेले गुळ, दिड कप गव्हाचे पीठ, अर्धा टीस्पून तूप.

कृतीः आळशी थोडी भाजून घ्या. त्यानंतर शेंगदाणे, अळशी व गुळ एकत्र करून घ्या. कढईत तूप गरम करून हे मिश्रण तूपावर परतून घ्या. मिश्रण थोडे गरम असतानाच लाडू वळून घ्या.
(अळशीमध्ये ओमेगा-3, कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. त्वचा व हृदयाच्या स्वास्थ्यासाठी अळशी फार महत्त्वाची आहे.)