बदाम लाडू (Almond Laddoos)

बदाम लाडू (Almond Laddoos)

बदाम लाडू – Almond Laddoos

Almond Laddoos

साहित्य :
अर्धा कप तूप, अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून रवा, अर्धा कप बदामाची जाडसर पूड, 2 टेबलस्पून खसखस, 2 कप पिठीसाखर, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पूड.
कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करा. त्यात गव्हाचं पीठ आणि रवा तीन-चार मिनिटं परतवून घ्या. त्यात बदामाची पूड आणि खसखस मिसळून आणखी दोन-तीन मिनिटं खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्या. आता हे मिश्रण तासभर थंड होण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण पूर्णतः थंड व्हायला हवं. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळा.
टीप : बदामाचे हे लाडू आठ दिवस चांगले टिकतात.