समर ड्रिंक- ऑल टाइम फेव्हरेट : टँगी ट्विस्ट (Al...

समर ड्रिंक- ऑल टाइम फेव्हरेट : टँगी ट्विस्ट (All Time Favorite : Tangi Twist)

फोटो सौजन्य – मेकिंग थीम फॉर हेल्थ

सध्या उन्हाळ्याचे इतके चटके बसू लागले आहेत की त्यामुळे उत्साह कमी होत चालला आहे. अशा या गरम वातावरणासाठी थंडगार टँगी ट्‌वीस्टचा पर्याय एकदम उत्तम आहे. संत्र, डाळिंब आणि द्राक्ष यांसारख्या फळांपासून अगदी झटपट बनणारं हे पेय आरोग्यास उत्तम आहेच शिवाय आपली मरगळ घालवून आपल्याला उत्साही बनवतं.

 

साहित्य – ४ संत्री (सोलून त्याचे दोरे काढून घ्या.)

१ कप डाळिंबाचे दाणे

१ कप हिरवी द्राक्षं

३-४ बर्फाचे तुकडे

 

कृती – सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या.

आवश्यकता वाटल्यास त्यात अर्धा कप पाणी घाला.

हे मिश्रण ग्लासमध्ये गाळून घ्या.

त्यात बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.