समर ड्रिंक- ऑल टाइम फेवरेट : मिंट जिंग (All Tim...

समर ड्रिंक- ऑल टाइम फेवरेट : मिंट जिंग (All Time Favourite: Mint Zing)

उन्हाळ्याची काहिली काही क्षणात घालवायची असेल तर मिंट जिंग करून पाहा. इंस्टंट आणि स्वादिष्ट बनतं. काकडी, पुदिन्याची पानं आणि हिरवं सफरचंद यापासून बनवण्यात येणारे हे पेय तुमची मरगळ घालवून लगेचच तजेला देतं.

साहित्य –

प्रत्येकी १-१ काकडी आणि हिरवं सफरचंद (तुकड्यांत कापलेलं)

२ कप एनर्जी ड्रिंक (कोणतंही)

६० मिली. ॲपल सिरप

१०-१२ पुदिन्याची पानं

कृती – हिरवं सफरचंद, काकडी आणि ॲपल सिरप मिक्सरमध्ये घालून त्याची मऊ पेस्ट बनवा.

एका ग्लासमध्ये फळांची पेस्ट आणि एनर्जी ड्रिंक घाला.

त्यात पुदिन्याची पानं घालून फ्रिजमध्ये थंड होण्याकरिता ठेवा.

एक तासानंतर सर्व्ह करा.