समर ड्रिंक- ऑल टाइम फेव्हरेट : अंगूरी सोडा (All...

समर ड्रिंक- ऑल टाइम फेव्हरेट : अंगूरी सोडा (All Time Favourite : Angoori Soda)

उन्हाळ्याचे चटके आता चांगलेच जाणवू लागले आहेत. अशा गरमीच्या दिवसांत स्वतःसाठी वा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चहा-कॉफी ऐवजी काही खास करायचं असेल तर ऑल टाइम फेव्हरेट पेय म्हणजे अंगूरी सोडा तुमच्यासाठी मस्त पर्याय आहे. काळी द्राक्षं, सोडा वॉटर आणि जिऱ्याचा स्वाद… व्वाव… क्षणात आपला थकवा दूर करणार. अगदी लगेच बनणारं हे पेय आरोग्यदायी तर आहेच आणि चवीलाही उत्तम!

फोटो सौजन्य : लेमुरिआ लाइट (Photo Credit: Lemuria Light*)

 साहित्य:

१ कप साखर आणि १ कप पाणी

२५० ग्रॅम काळी द्राक्षं

काळं मीठ आणि लिंबाचा रस स्वादानुसार

१ टीस्पून जिरा पावडर

३-४ बर्फाचे खडे

१०० मिलीलीटर सोडा वॉटर

कृती :

एका पॅनमध्ये पाणी आणि साखर एकत्र करून उकळवा. साखर विरघळेपर्यंत ढवळत राहून उकळी येऊ द्या. नंतर आचेवरून खाली घेऊन थंड होण्यास ठेवा.

मिक्सरमध्ये काळी द्राक्षं घालून वाटून घ्या. आता गाळणीने गाळून त्याचा रस काढा.

एका ग्लासमध्ये ३-४ टेबलस्पून काळ्या द्राक्षांचा पल्प, २ टेबलस्पून साखरेचा पाक, काळं मीठ, लिंबाचा रस, जिरे पावडर, आइस क्यूब्स आणि सोडा वॉटर घालून ठंडगार सर्व्ह करा.