आवळ्याचं लोणचं (Aamla Pickle)

आवळ्याचं लोणचं (Aamla Pickle)

आवळ्याचं लोणचं

साहित्य : 10-12 आवळे, अर्धा वाटी मोहरीची डाळ, अर्धा वाटी मीठ, 10 ग्रॅम हिंग, 3 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मेथीदाणे, 1 टीस्पून बडीशेप, आवश्यकतेनुसार तेल.

कृती :
आवळे स्वच्छ धुऊन मऊ होईपर्यंत उकडून घ्या. नंतर त्यातील बिया काढून पाकळ्या सुट्या करा. एका कढईत तेल गरम करून त्यात मेथी लालसर तळून घ्या. त्याच तेलात मोहरीची डाळी तळून बाजूला काढून ठेवा. मेथी दाणे थंड झाल्यावर कुटा. बडीशेप कोरडीच शेकून घ्या. नंतर थंड करून कुटा. आता एका भांड्यात मेथी, मोहरी आणि मीठ यांचं एकजीव मिश्रण करा. गरम तेलात हिंग, लाल मिरची पूड, हळद यांची फोडणी करा. त्यात बडीशेप थोडा वेळ परतवा. ही फोडणी मेथी-मोहरीच्या मिश्रणात घालून एकजीव करा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आवळ्याच्या फोडी घाला आणि व्यवस्थित एकत्र करा. हे लोणचं स्वच्छ कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीत भरा. त्यावर गरम करून थंड केलेलं तेल ओता. दोन दिवस लोणचं मुरू द्या. नंतर खायला घ्या.