आवळा कँडी (Aamla Candy)

आवळा कँडी (Aamla Candy)

आवळा कँडी

साहित्य : 1 किलो आवळे, 700 ग्रॅम साखर.

कृती : आवळे स्वच्छ धुऊन, पाण्यात उकळत ठेवा. साधारण 2-3 मिनिटं आवळे चांगले उकळले की, आचेवरून उतरवा आणि पाणी निथळून घ्या. आवळे पूर्णतः थंड होऊ द्या. आता आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. त्यात साखर एकत्र करून झाकण लावा आणि तीन दिवस मुरायला ठेवून द्या. नंतर आवळे गाळून ताटात किंवा ट्रेमध्ये ठेवा. हे ताट दोन दिवस उन्हात ठेवा, म्हणजे आवळे व्यवस्थित सुकतील. सुकलेल्या आवळ्यांवर आवडत असल्यास पिठीसाखर भुरभुरा. ही आवळा कँडी स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा.