आलू पराठा (Aaloo Paratha)

आलू पराठा (Aaloo Paratha)

आलू पराठासाहित्य :
4-5 उकडलेले बटाटे, 1 वाटी वरई, अर्धा वाटी केळ्याचं पीठ, 3 टीस्पून मिरची-आलं-जिरं यांचं वाटण, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ.

कृती : बटाटे सोलून, जाडसर किसून घ्या. त्यात मीठ, कोथिंबीर आणि वाटण घालून चांगलं मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे वळा. वरई-केळ्याचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून घ्या. त्यात गरजेनुसार गरम पाणी घालून पीठ मळून घ्या. हे पीठ थोड्या वेळाकरिता तसंच ठेवून द्या. नंतर या पिठाची वाटी तयार करून त्यामध्ये सारण भरा आणि गोळी बंद करा. आता ही गोळी अलगद लाटा. गरम तव्यावर कोरडा किंवा तेल-तुपावर पराठा शेकून घ्या.