कवठ व गव्हांकूर सरबत (A wood- Apple and Wheat G...

कवठ व गव्हांकूर सरबत (A wood- Apple and Wheat Grass juice)

कवठ व गव्हांकूर सरबत

साहित्य : अर्धा वाटी पिकलेल्या कवठाचा गर, 1 वाटी गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात, 10-12 तुळशीची धुऊन चिरलेली पानं, 1 वाटी साखरेच्या गाठीचा चुरा (साखरेची पदकं), चवीनुसार मीठ, 1 टीस्पून जिरेपूड, थोडे बर्फाचे तुकडे.

कृती : कवठाच्या गराचं आणि गव्हांकुराचं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधून मऊसर वाटण तयार करून घ्या. एका बाऊलमध्ये ही पेस्ट गाळून त्यात साखरेची गाठी, चवीनुसार मीठ आणि 4 ग्लास पाणी घालून चमच्याने ढवळा. एका ग्लासमध्ये हे सरबत घेऊन, वरून जिरेपूड आणि तुळशीची पानं घालून, आईस क्यूब्स घाला आणि सर्व्ह करा.
लाभ : उन्हाळी लागल्यास थोडं थोडं सरबत घेतल्यास, हमखास फायदा होतो.