चीझच्या 2 वेगळ्या पाककृती (2 Different Cheese R...

चीझच्या 2 वेगळ्या पाककृती (2 Different Cheese Recipes)

राइस अँड चीझ फ्रिटर्स
चीझच्या पाककृती, Cheese Recipes
साहित्य : 1 कप शिजवलेला भात, 2 टेबलस्पून किसलेलं चीझ, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून गाजराचा कीस, 2 टेबलस्पून फेटलेलं दही, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. गरमागरम राइस अँड चीझ फ्रिटर्स हिरवी चटणी किंवा शेजवान सॉससोबत सर्व्ह करा.

 

चीझ फिंगर्स
चीझच्या पाककृती, Cheese Recipes
साहित्य : 1 कप मैदा, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 200 ग्रॅम मोझोरेला चीझ, 1 कप ब्रेडचा चुरा, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : मैद्यामध्ये लाल मिरची पूड, मीठ आणि काळी मिरची पूड मिसळून दाट मिश्रण तयार करा. चीझचे अर्धा इंच रुंदीचे आणि 2 इंच लांबीचे तुकडे करा. हे तुकडे मैद्याच्या मिश्रणात घोळवून ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवा. पुन्हा मैद्याच्या मिश्रणात घोळवून, ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवा आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर तेल गरम करून त्यात हे फिंगर्स सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम चीझ फिंगर्स हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

क्रिस्पी बनाना फ्राय (Crispy Banana Recipe)