रवीना टंडनची लेक राशा थडानी बॉलिवूड पदार्पणासाठ...

रवीना टंडनची लेक राशा थडानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज (Raveena Tandon’s Daughter Rasha Thadani Is All Set For Bollywood Debut, Deets Inside)

अभिनेत्री रवीना टंडनप्रमाणेच तिची मुलगी राशा थडानी देखील तिच्या लूकमुळे आधीच चर्चेत आहे. कोणी तिला आईची कार्बन कॉपी म्हणतात तर कोणी तिला सुंदर म्हणतात. आता तर राशा आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूर १७ वर्षांच्या राशाला लाँच करणार असल्याचे बोलले जाते. या चित्रपटात अजय देवगण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण देखील या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट अॅक्शन अॅडव्हेंचर असणार असून अजयही एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे.

अभिषेकबद्दल बोलायचे झाले तर त्याने काई पो चे, चंदिगड करे आशिकी, रॉक ऑन आणि केदारनाथ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. केदारनाथ या चित्रपटातून सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसला होता.

अजय देवगण सिंघमच्या सिक्वेल आणि भोलामध्येही दिसणार आहे. दुसरीकडे, राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिची फॅमफॉलोविंग खूप मोठी आहे. लोक अजूनही रवीनाच्या सौंदर्याचे कौतुक करतात. अनेकदा तिला राशाची बहीण म्हणतात. अजय देवगणच्या पुतण्यासोबत तिची मुलगी राणी रुपेरी पडद्यावर काय जादू दाखवते हे पाहणे रंजक ठरणार आहे.