गणेश चतुर्थीला रविना टंडनची मुलगी राशाला बघून च...

गणेश चतुर्थीला रविना टंडनची मुलगी राशाला बघून चाहते चित्कारले, म्हणाले- ‘आईपेक्षा आहे मुलगी सुंदर…’ (Raveena Tandon Spotted With Her Beautiful Daughter Rasha Thadani While Visiting Shilpa Shetty’s Home For Ganpati Darshan, See Stunning Pictures)

गणेश चतुर्थीला रविना टंडन आपली तरुण मुलगी राशा हिला घेऊन गणपतीला शिल्पा शेट्टीच्या घरी गेली.  याप्रसंगी रविनाने मरून कलरचा तर राशाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

या दोघींना पाळतीवर असलेल्या फोटोग्राफर्सनी गाठले व त्यांचे चिक्कार फोटो काढले. जे सोशल मीडियावर वेगाने पसरले. अन् राशाच्या सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

तसं पाहायला गेलं तर रविना आणि राशा, दोघीही सुंदर दिसत होत्या. पण राशाच्या सौंदर्याची तारीफ होऊ लागली आहे. चाहते राशावर सतत कमेंट्स करू लागले आहेत.

एकाने म्हटले- ‘ अगदी आईसारखी सुंदर दिसतेय.’ तर दुसरा म्हणाला- ‘ आईपेक्षा जास्त सुंदर मुलगी आहे.’ आणखी काहीजण म्हणाले की, आम्हालाही तारा सुतारीयाच वाटते आहे.

काही चाहत्यांनी राशाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा सल्ला दिला असून ही पुढची आलिया भट्ट असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पूजेचे ताट घेतलेली रविना छायाचित्र दिसत आहे.अन् पारंपरिक वेशभूषेत आई- मुलगी सुंदर -सोज्वळ दिसत आहेत.