रविना टंडनने प्रकाशात आणली बॉलिवूडची काळी बाजू;...

रविना टंडनने प्रकाशात आणली बॉलिवूडची काळी बाजू; म्हणते, ‘मी हिरोबरोबर झोपले नाही…’ (Raveena Tandon Reveals Dark Side Of Bollywood; Says I Didn’t Slept With Heroes)

मस्त-मस्त गर्ल अशी ओळख असलेल्या रविना टंडनला अचानक उपरती सुचली. तिनं बॉलिवूडची काळी बाजू प्रकाशात आणली…

‘पिंकविला’ या वेबसाईटमध्ये तिचे हे खुलासे उघड झाले आहेत. त्यामध्ये रविना म्हणते, ”या क्षेत्रात लोक मला आरोगंट म्हणत असत. माझा कुणीही गॉडफादर नव्हता. मी कोणत्याही कंपूशाहीत सामील नव्हते. कुठलाही हिरो मला प्रमोट करत नव्हता. मी कोणत्याही हिरोबरोबर झोपले नाही. कुठल्याही हिरोच्या मर्जीप्रमाणे मी वागत नव्हते. तो म्हणेल तेव्हा हसायचं, त्यानं म्हटलं बस, तर मी बसायचं; असलं काहीही मी केलं नाही…”
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युबाबत रविना टंडनने निर्भयपणे मत प्रदर्शित करत ट्वीट केले की, ”फिल्म इंडस्ट्रीत घाणेरडे राजकारण आहे. ती म्हणते, ही मीन गर्ल इंडस्ट्री गँग आहे. हिरोज्‌, त्यांच्या गर्लफ्रेंडस्‌, चमचे पत्रकार आणि खोट्या बातम्या देऊन त्यांना चित्रपटामधून काढलेले आहे. या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो, लढावं लागतं.”

रविना आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिते, ”इथे तुम्ही खरं बोललात तर तुम्हाला खोटारडे आणि पागल आहे, असं म्हणतात. त्यावर चमचे पत्रकार भरभरून लिहितात. त्यांना इंडस्ट्रीने बरंच साहित्य पुरविलं आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. पण घाणेरड्या राजकारणामुळे माझं मन विटलं.”
आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये रविना लिहिते, ”मला या इंडस्ट्रीविषयी प्रेम आहे. पण इथे दडपणं देखील खूप आहे. इथे चांगले आणि वाईट लोक आहेत. जग हे असंच आहे. उद्या तरी चांगलं काही घडेल अशी मी प्रार्थना करते.” सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत रविनाने हे जे ट्वीट केलं आहे त्यातून या चकाकत्या फिल्म इंडस्ट्रीत या कटू गोष्टी आढळून येतात, याबद्दल विचार करायला लावलं आहे.

करोना व्हायरस निर्माण झाला तोच चीनमधून. तिकडच्या बाजारात बऱ्याच प्राण्यांच्या मांसाची विक्री होते. त्यातून करोना पसरला असावा अशी वंदता आहे. रविनाला चीनी लोकांचे हे अभक्ष्य भक्षण बिल्कूल आवडत नाही. त्यावर रविनाने ट्वीट केले, ”एवढी मोठी किंमत चुकवावी लागली, तरी लोकांनी धडा शिकला नाही. विविध प्राण्यांच्या जीवनाशी खेळ करून वन्यजीवनाचा अपराध करण्याबाबत चीन हा जगातील सर्वात वाईट देश आहे.”

असं काय घडलं की हेमा मालिनीला अश्रू आवरले नाही…