रसिका सुनीलचा नवरात्र साजरा करण्याचा वेगळा ढंग ...

रसिका सुनीलचा नवरात्र साजरा करण्याचा वेगळा ढंग (Rasika Sunil Alias Ex-Shanaya Celebrates Navaratri With A Social Concern)

मराठी टेलीव्हिजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आणि महाराष्ट्राचं लाडक पात्र शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने एका वेगळ्या ढंगात नवरात्र साजरी केली. रसिकाने दादर येथील कमला मेहता अंध मुलींच्या शाळेतील मुलींसोबत काही क्षण घालवले. मुलींसोबत दांडिया रंगवण्याबरोबरच तिने तब्बल २५० अंध मुलींच्या रिंगणात गरब्यावर ताल धरला.

रसिकाने याचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच – “लहानपणापासूनच नवरात्री साजरी करतेय, पण यंदाची नवरात्रोत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी इतक्या सुंदर आणि बुद्धिवान मुलींच्या सानिध्यात काही क्षण घालवले. माझ्यासाठी त्या नवदुर्गा असून एक डोळस नवरात्र मी या निमित्ताने साजरी केली आहे ” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

रसिकाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे रसिकाच्या नवरात्रीच्या या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत तसेच तिचे कौतुकही करत आहेत.   

माझ्या नवऱ्याची बायको या झीमराठी वाहिनीवरील मालिकेतील शनाया या भूमिकेने रसिकाला प्रसिद्धी मिळवून दिली. तिने त्यानंतर चित्रपटांतही काम केलं परंतु तिची शनाया हीच ओळख लोकप्रिय झाली आहे. मात्र परदेशात शिकायला जाण्यासाठी रसिकाला ही मालिका अर्धवट सोडावी लागली होती. त्यानंतर बराच काळ ती अभिनयापासून दूर होती. आगामी रसिकाचे तीन चित्रपट येणार असून तिने याबाबत आत्ताच काही जाहीर करणेबाबत मौन पाळले आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्न केले, त्याचेही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.