नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचे या वादांशी आहे जुने...

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचे या वादांशी आहे जुने नाते, वादांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती अभिनेत्री (Rashmika Mandanna’s Name Associated With These Controversies, Due to Which She had Trolled Fiercely)

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’ चित्रपटापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटानंतर टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे, यासोबतच ती राष्ट्रीय क्रशही झाली आहे. 2022 मध्ये ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी रश्मिका मंदान्ना सध्या आपल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच रश्मिकाशी संबंधित अनेक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

रश्मिका मंदान्नाने तिच्या ‘मिशन मजनू’ या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असे वक्तव्य केले होते, जे ऐकल्यानंतर चाहते चांगलेच संतापले. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाने सांगितले होते की, ती बॉलिवूडमधील रोमँटिक गाणी ऐकत मोठी झाली आहे.

याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांवर भाष्य करताना रश्मिका म्हणाली होती की, तिथे जास्त मेन स्ट्रिम आणि आयटम साँग जास्त असतात. लहानपणापासून रोमँटिक गाण्यांचा अर्थ म्हणजे माझ्यासाठी बॉलिवूड गाणी असायचा, तर दक्षिण भारतीय चित्रपटातील गाणी बहुतेक मसाला आयटम नंबर असतात, त्यात भरपूर नृत्य असते.

तुम्ही रश्मिका मंदान्ना आणि विकी कौशल यांच्या अंडरवेअर ब्रँडची जाहिरात पाहिली असेल, परंतु पुरुषांच्या अंडरवेअरच्या जाहिरातीतील मजकूर प्रेक्षकांना आवडला नाही, त्यासाठी रश्मिका आणि विकीला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. या जाहिरातीला विरोध करताना युजर्स रश्मिकाला म्हणाले होते की,  अभिनेत्रीने काळजीपूर्वक प्रोजेक्ट निवडला पाहिजे. अशा अश्लील जाहिरातींचा भाग बनू नये.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा’ चित्रपट न पाहिल्यामुळेही रश्मिकाला खूप ट्रोल करण्यात आले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांनंतर रश्मिकाला कंतारा च चित्रपट पाहिला आहे का असे विचारण्यात आले होते, तेव्हा अभिनेत्रीने अद्याप चित्रपट पाहिला नाही असे उत्तर दिले. यानंतर अभिनेत्री आपल्या वरिष्ठांचा आदर करत नसल्याचा आरोप करत तिला खूप ट्रोल करण्यात आले.

रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट ‘गुडबाय’च्या प्रमोशनदरम्यान, तिची एक मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यामध्ये तिने सांगितले होते की तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. तिला एकदा एका प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला आणि तो एक प्रँक कॉल असल्याचे समजले. अभिनेत्रीने त्या मुलाखतीत त्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सांगितले नसले तरी त्यानंतर तिच्यावर कन्नड चित्रपटसृष्टीतून बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती.

रश्मिका मंदान्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2016 मध्ये रक्षित शेट्टीसोबत ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर 2017 मध्ये तिने KGF स्टार यशबाबत असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे ती मोठ्या वादात सापडली होती. एका मुलाखतीत अभिनेत्रीने यशला कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा मिस्टर शो ऑफ म्हटले होते, त्यामुळे अभिनेत्रीला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.