अमिताभ बच्चनला भेटून खूप घाबरली रश्मिका मंदना, ...

अमिताभ बच्चनला भेटून खूप घाबरली रश्मिका मंदना, अभिनेत्रीने सांगितले कारण (Rashmika Mandanna Was Very Scared To Meet Amitabh Bachchan, The Actress Told The Reason)

साउथकडील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना गुड बाय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्तासुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, या चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट खूपच भावूक असणार असे दिसते. ट्रेलर पाहून लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील हिक हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. त्यासाठी रश्मिका दिल्लीला गेली होती. तेव्हा तिथे तिने बिग बींसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटली तेव्हा ती खूप घाबरली होती.

मीडियाशी बोलताना रश्मिका म्हणाली, ‘बच्चन सरांसोबत काम करायला खूप मजा आली. बच्चन सरांसोबत माझा पहिला हिंदी चित्रपट करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. ते उत्तम शिक्षक आहेत.”

जेव्हा रश्मिकाला विचारण्यात आले की तिची अमिताभ बच्चन यांच्यासोबतची पहिली भेट कशी होती, तेव्हा ती म्हणाली, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांचा तो वावर पाहून मला खूप भीती वाटली. पण ते खूप चांगले माणूस आहेत. शूटिंगदरम्यान मी त्यांना नीट ओळखू शकले.

अमिताभ बच्चनबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली की, मी स्पंजसारखी आहे. मी माझ्या सहकलाकाराचे टॅलेण्ट शिकते. ‘गुडबाय’पूर्वीची रश्मिका आणि ‘गुडबाय’ नंतरची रश्मिका पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यात बच्चन सरांची भूमिका खूप मोठी आहे.

स्टेजवर चढण्यापूर्वी रश्मिकाने स्टेजवर नतमस्तक होऊन सर्वांची मने जिंकली. तिचा हा व्हिडिओ पापाराझी व्हायरल भयानी यांनी शेअर केला आहे. रश्मिकाच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. युजर्स रश्मिकाच्या वागण्याबोलण्याचं कौतुक करत आहेत.

‘गुडबाय’ हा चित्रपट विकास बहलने दिग्दर्शित केला आहे. हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटात भावना, विनोद, प्रेम, राग रुसवे यांचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात नीना गुप्ता अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ही जोडी पहिल्यांदाच चित्रपटाच्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय एली अवराम, सुनील ग्रोव्हर, अभिषेक कानन, पावेल गुलाटी आणि साहिल मेहता हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.