रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा लग्नाच्...

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा लग्नाच्या पोशाखातील फोटो व्हायरल, नक्की काय आहे यामागील सत्य? (Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Photo Viral On Internet Amid Dating Rumours)

सोशल मीडियावर नुकताच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे वधू-वराच्या पोशाखात दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला असून त्यांचं खरंच लग्न झालं का? असं अनेकजण विचारताहेत.


चाहत्यांना दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही जोडी खूप आवडते. त्यांनी लवकरच लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. असे असताना विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच डेटिंगच्या चर्चां दरम्यान रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी लग्न केले का? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
तर काहींना हा लग्नाचा फोटो एडिट केल्यासारखा वाटत आहे.


अद्याप त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. दोघेही एकमेकांना नेहमीच मित्र मानतात. पण चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ च्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने विजय आणि रश्मिका रिलेशनशिपमध्ये आहेत आणि दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे संकेत दिले होते.


जान्हवी कपूरने विजयला “प्रॅक्टिकली मॅरिड” असे संबोधले. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या अफवांच्या दरम्यान, रश्मिका आणि विजयचे वधू आणि वराच्या पोशाखातले फोटो त्यांच्या चाहत्याने ऑनलाइन एडिट केले आहेत.
काही दिवसांपूर्वी विजय आणि रश्मिका मालदीवला सहलीचा आनंद घेण्यासाठी गेले होते.