रश्मिका मंदानाने शेअर केले मालदीवमधून हॉट फोटो,...

रश्मिका मंदानाने शेअर केले मालदीवमधून हॉट फोटो, चाहते झाले घायाळ (Rashmika Mandanna Shares Sensual Pics From Maldives Vacation- Fans Says You Set Internet On Fire)

‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा गुडबाय हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळत आहे. साऊथची ही अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये सहलीचा आनंद घेत आहे. याशिवाय ती अभिनेता विजय देवराकोंडासोबत रिलेशलनमध्ये असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच ते दोघे विमानतळावर एकत्र दिसले होते. तेव्हापासून ते दोघे मालदीवला फिरायला गेले असतील असा अंदाज चाहत्यांनी लावला होता. रिलेशनशिपच्या बातम्यांदरम्यान, रश्मिकाने आपल्या सोशल मीडियावर मालदीवच्या सहलीचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री मालदीवमधील सहलीचे फोटो सतत आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिच्या त्या घायाळ करणाऱ्या फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.

फोटोत रश्मिका ब्लॅक ब्रालेट आणि मॅचिंग बॉटममध्ये परफेक्ट व्हेकेशन फॅशन गोल सेट करत आहे. सोबतच सनग्लासेस, हॅट आणि बीच वेअर ज्वेलरी घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

रश्मिकाने आपली बिकिनी ओव्हर साइज शर्टने कव्हर केली आहे. चाहत्यांनी तो शर्ट विजय देवरकोंडाचा असल्याचा अंदाज लावला आहे.

याआधी जेव्हा रश्मिकाने चष्मा घातलेला फोटो शेअर केला होता. तेव्हा युजर्स तो चष्मा विजयचा आहे असे कमेंटमध्ये म्हणत होते. मालदिवला जाते वेळी विजयने सुद्धा तोच चष्मा घातल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना आणि डिनर डेटवर जाताना दिसले आहेत. मात्र त्यांच्या मते ते एकमेकांना केवळ मित्र मानतात. त्यामुळेच रश्मिका मालदीवमधील तिचे एकटीचे फोटो शेअर करत असते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम