रश्मिका मंदानाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या या गोष्...

रश्मिका मंदानाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या या गोष्टी चोरायच्या आहेत(Rashmika Mandana Wants To Steal This Things From Bollywood Actress)

पुष्पा या चित्रपटातून अभिनेत्री रश्मिका मंदनाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. या चित्रपटामुळे तिला नॅशनल क्रश म्हटले जाऊ लागले. पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन सोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. नुकतेच रश्मिकाने गुडबाय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तिला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रश्मिका वेगवेगळ्या कार्यक्रमांना तसेच इव्हेंटना उपस्थिती लावत होती. वेगवेगळ्या मुलाखती देत होती. अशाच एका मुलाखतीत रश्मिकाला तिथे उपस्थित पत्रकाराने तू बॉलिवूड अभिनेत्रींकडून कोणत्या गोष्टी चोरशील असा प्रश्न विचारला. तेव्हा रश्मिकाने अगदी मनमोकळेपणे त्या प्रश्नाचे उत्तर दिले.

ती म्हणाली की मी आलिया भट्टकडून तिचा खरेपणा चोरीन कारण ती खूप खरी आहे. दीपिका पादुकोणकडून चोरायचे झाल्यास तिचे हास्य चोरीन कारण ती खूप गोड हसते. मला तिचे हास्य खूप आवडते. अभिनेत्री कतरीना कैफकडून मी तिच्यातला तिचा मेहनतीचा गुण घेईन, कारण ती खूप मेहनती आहे.

रश्मिका बद्दल सांगायचे झाल्यास तिने 2016 मध्ये किरिक पार्टी या साऊथ चित्रपटातून आपल्या करीअरची सुरुवात केली होती. पण तिला खरी ओळख पुष्पा या चित्रपटामुऴे मिळाली. या चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती. सध्या ती पुष्पा 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.