रश्मिका मंदानाचा भाव वधारला: ‘गुडबाय̵...

रश्मिका मंदानाचा भाव वधारला: ‘गुडबाय’ साठी तिने मोजून घेतले दाम (Rashmika Mandana Took Such A Fee For Working In Goodbye, You Will Be Stunned To Know)

साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे, त्यामुळे ती खूप चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने नेहमीच लोकांची मने जिंकली आहेत. रश्मिकाने आपल्या करीअरमध्ये आतापर्यंत सर्व सुपरहिट चित्रपट दिले.

रश्मिकाच्या बॉलिवूडमधील करीअरची सुरुवात मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत होणार आहे. आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती कोणतीही कसर सोडत नाही आहे. तसंच मीडियासोबतचं तिचं वागणं लोकांना खूप आवडत आहे. ती आपल्या प्रत्येक अदांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.

‘गुडबाय’ चित्रपटात रश्मिकाही अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा प्रोमो पाहून चित्रपटाची कथा खूपच मजेदार असणार असल्याचे वाटते. रश्मिकाचे हे पात्र तिच्या इतर चित्रपटांतील व्यक्तिरेखांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अभिनेत्रीने आपल्या करीअरची सुरुवात कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’मधून केली होती. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. साऊथ सिनेसृष्टीत यशस्वी झाल्यानंतर तिची फी दिवसेंदिवस वाढत गेली. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ती 4 कोटी घेत असली तरी ‘गुडबाय’ चित्रपटातील अमिताभ बच्चनसोबतच्या पात्रासाठी रश्मिकाने 5 ते 6 कोटी फी घेतली आहे.

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेला ‘गुडबाय’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटात कुटुंबांमधील मतभेद आणि भांडणांव्यतिरिक्त प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमाचे एक नवीन रूप देखील पाहायला मिळेल. या चित्रपटात अमिताभ बच्चन रश्मिका मंदानाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. चित्रपटात रश्मिकाचे तिच्या वडीलांशी फारसे पटत नाही. या दोघांशिवाय नीना गुप्ता, आशिष विद्यार्थी, सुनील ग्रोव्हर, अरुण बाली आणि शिविन नारंग हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम