दोन वेळच्या जेवणाची आबाळ असणारी रश्मी देसाई आता...

दोन वेळच्या जेवणाची आबाळ असणारी रश्मी देसाई आता आहे करोडोंच्या संपत्तीची मालकीण (Rashmi Desai Who Had Faced Financial Trouble in Her Early Life, Now She is the Owner of Property of Crores)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने टीव्ही इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे नाव टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.पण रश्मी देसाईला इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. प्रचंड मेहनत आणि मोठ्या संघर्षानंतर रश्मी देसाई आज इथपर्यंत पोहोचली आहे. एकेकाळी या अभिनेत्रीला दोन वेळचे जेवण देखील मिळायचे नाही. पण आज ती करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे.

एका मुलाखतीत रश्मी देसाईने आपले सुरुवातीचे दिवस कसे होते ते सांगितले होते.त्यावेळी तिने सांगितले की, मी वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. मी 2006 पासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे.माझी आई सिंगल पॅरेंट होती, त्यामुळे मला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा माझ्याकडे दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून माझी आई एकटीच दिवसरात्र कष्ट करायची. अशा परिस्थितीत, मी वयाच्या 16 व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली होती.

रश्मी देसाई आज एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने हिंदी, भोजपुरी चित्रपट तसेच वेब सिरीजमध्येही काम केले आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘उत्तरन’ या मालिकेतून तिला टीव्हीवर खरी ओळख मिळाली, त्या मालिकेत तिने तपस्याची भूमिका केली होती. या मालिकेतून घरोघरी लोकप्रिय झाल्यानंतर रश्मी देसाई ‘दिल से दिल तक’मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिच्या विरुद्ध दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला मुख्य भूमिकेत होता.

आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर सर्वांच्या मनावर राज्य करणारी रश्मी देसाई टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली. टीव्ही सीरियल्समध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी रश्मी ‘बिग बॉस 13’ आणि ‘बिग बॉस 14’ मध्येही दिसली आहे. याशिवाय रश्मी ‘खतरों के खिलाडी 6’ मध्येही खेळताना दिसली होती.

रश्मी देसाई गेल्या 14 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सध्या ती करोडोंची मालकीण आहे. आजच्या तारखेला रश्मी देसाई 5 फ्लॅटची मालकीण आहे. रश्मीकडे ६० लाख ते ३ कोटी रुपयांच्या मर्सिडीजसह अनेक महागड्या गाड्या आहेत. रश्मी देसाईच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर ती एकूण ७.१२ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.