रश्मी देसाईने पांढरी बिकिनी घालून केले यौवन प्र...

रश्मी देसाईने पांढरी बिकिनी घालून केले यौवन प्रदर्शन : चाहत्यांचे झाले मनोरंजन (Rashmi Desai Shares Her Bold Pics From Maldives : Fans Get Crazy Of Her White Bikini Look)

टेलिव्हिजनवरील गोड दिसणारी अभिनेत्री रश्मी देसाई मालदीवमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे, अन्‌ न विसरता तेथील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत आहेत. छायाचित्रांमध्ये पांढऱ्या बिकिनीतील अभिनेत्रीची स्टाईल पाहून तिच्या चाहत्यांचे भान हरपले आहे. रश्मी देसाईचे हे बोल्ड फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांची या छायाचित्रांवरून नजरच हटत नाहीये.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

रश्मी देसाईने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर मालदीवच्या सुट्टीतील तिचे हे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री जाळीदार पांढऱ्या बिकिनीमध्ये पाण्यामधील तिचा हॉट लुक दाखवत आहे. एका चित्रात ती समुद्रकिनारी तिच्या नाश्त्याचे कौतुक करताना दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रात ती डोक्यावर टोपी घालून तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवत आहे, तर एका चित्रात ती पाण्याखाली तरंगता नाश्ता करून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. या दरम्यान तिची पांढऱ्या बिकिनीमधील बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.

या फोटोंसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘ॲक्वा होलिक’ असे लिहिले आहे. रश्मी देसाईच्या या फोटोंना चाहत्यांनी विशेष पसंत दर्शविली आहे. लोकांनी कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करून तिला जलपरी असं म्हटलं आहे, तर एका चाहत्याने लिहिले आहे – खा यार, नाश्ता थंड होईल. तर बऱ्याच चाहत्यांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

पांढऱ्या बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर करण्यापूर्वी रश्मीने हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्याची नेकलाइन खूपच खोल आहे. या ड्रेसमध्ये रश्मीने मध्यरात्री एका झाडाजवळ तिचे फोटो क्लिक केले आहेत. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये रश्मीच्या स्टाईलने चाहत्यांची झोप उडवली आहे आणि तिच्या पांढऱ्या बिकिनी फोटोंप्रमाणेच तिचे हे फोटोही सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रश्मी देसाईने यापूर्वीही एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती शॉर्ट स्कर्ट आणि डीप नेक बॅक ओपन टॉपमध्ये दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी रश्मीने डोक्यावर टोपी घेतली आहे. व्हिडिओमध्ये तिची घायाळ करणारी स्टाईल दाखवत रश्मी ‘कोई शेहरी बाबू’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने त्यास ‘माझ्या सारखा साधासा ट्रेंड…’ अशी कॅप्शन दिली आहे.

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘उत्तरन’ या टीव्ही सीरियलने तिला घरोघरी वेगळी ओळख मिळवून दिली, ज्यामध्ये तिने तपस्याची भूमिका साकारली होती. या मालिकेतील रश्मीचे पात्र थोडे नकारात्मक असले तरी या पात्रामुळे ती चांगलीच लोकप्रियही झाली. रश्मी ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसली आहे. ‘दिल से दिल तक’ या मालिकेतील रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ‘नागिन-4’ मध्येही ती दिसली आहे. अनेक टीव्ही मालिका आणि शोमध्ये दिसणाऱ्या रश्मी देसाईने भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.