मलायका-शिल्पा या आपल्या प्रेरणा आहेत असं म्हणत ...

मलायका-शिल्पा या आपल्या प्रेरणा आहेत असं म्हणत रश्मी देसाईने शेअर केला फिटनेस व्हिडिओ, नेटकऱ्यांनी तिला जाडी म्हणून उडविली खिल्ली… (Rashami Desai Gets Brutally Trolled For Her Work Out Challenge Video)

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या गोंडस रुपामुळे चाहत्यांना खूपच आवडते. ती कोणत्याही लूकमध्ये छानच दिसते अशी तिची खासियत आहे. परंतु सध्या ती तिच्या एका फिटनेस व्हिडिओमुळे ट्रोल होत आहे.

इंस्टाग्राम वा इतर सोशल मीडियावरही डान्स वा फिटनेस बाबतचे ट्रेंड चालूच असतात. यामध्ये खास प्रकारच्या वर्कआउट्सचा एक ट्रेंड सध्या प्रसिद्धी पावत आहे. मलायका अरोराने देखील असाच एक फिटनेस व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भिंतीच्या सहाय्याने उलटे होऊन एक पाय हवेत वरच्या दिशेला आणि एक पाय भिंतीवर टेकवायचा असतो. रश्मीने मलायका आणि शिल्पाला व्हिडिओमध्ये टॅग केले आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे चॅलेंज अतिशय सहजतेने पूर्ण केले. शिवाय याबाबतचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

याच व्हिडिओमुळे रश्मी ट्रोल झाली आहे. या कलाकार मंडळींचे कौतुक करणारे आहेत तसेच त्यांना ट्रोल करणारे निंदकही आहेतच. त्यांनी तिचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ पाहून तिला लठ्ठ म्हटले आहे. अजूनही काहीबाही बोलत तिला लज्जित केले आहे.

एका युजरने लिहिले की, ज्यांनी तुम्हाला प्रेरित केले त्यांच्यासारखी बारीक हो. तर काहींनी लिहिले की, हे करूनही बारीक होत नाही… काही युजर्सनी कमेंट केली की, हे सगळं करून काय फायदा आहे आणि तुम्ही स्वतःच फिटनेसला गांभीर्याने घेत नसताना त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काय उपयोग? लोक बारीक होण्यासाठी हे सर्व करतात आणि तुम्ही दिवसेंदिवस जाड होत आहात, असे म्हणत लोक तिच्यावर हसत आहेत.

काही चाहत्यांनी रश्मीने तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे आणि लोकांच्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याच वेळी ते असेही म्हणत आहेत की आम्हाला ट्रोलर्स म्हणतात. पण रश्मीने अशा दोन महिलांना टॅग केले आहे की ज्या फक्त त्यांच्या फिटनेससाठी ओळखल्या जातात. असे करून रश्मीने स्वतःच ट्रोलर्सना आमंत्रित केले आहे.

रश्मीच्या काही चाहत्यांनी तिच्या या प्रयत्नांचे कौतुकही केले आहे. नुकतेच रश्मीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रे देखील पोस्ट केली आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे आणि चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.