तुमच्या आवडत्या कलाकारांचे कधीही न पाहिलेले, बा...

तुमच्या आवडत्या कलाकारांचे कधीही न पाहिलेले, बालपणाचे दुर्मिळ फोटो (Rare And Unseen Childhood Photos Of Your Favorite Bollywood Actors)

सोनू सूद : करोना काळात सोनू सूदने लोकांना जी मदत केली आहे, त्यामुळे या लोकांसाठी सोनू देवापेक्षा कमी नाही. त्याचं हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. पाहूया त्याची बालपणीची काही दुर्मिळ छायाचित्रे.

शाहिद कपूर : बॉलिवूडमधील फिटेस्ट आणि उत्तम डान्सर अशी ओळख असलेला अभिनेता शाहिद कपूर लहान असल्यापासून ॲड फिल्म्स आणि म्युझिक व्हिडिओज्‌मध्ये दिसला आहे. परंतु त्याचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले फोटो पाहा… या फोटोंमध्ये शाहिद सोबत इशान खट्टर देखील कुठे कुठे तुम्हाला दिसेल.

अमिताभ बच्चन : बिग बी अमिताभजी आपल्या आई-वडिलांच्या अगदी जवळ होते. आपल्या लहानपणीचे फोटो नेहमी ते त्यांच्यासोबत शेअर करायचे. परंतु त्यांची ही काही छायाचित्रे तुम्ही कधी पाहिली नसतील.

अक्षय कुमार : मिस्टर खिलाडी अक्षयकुमार देखील लोकांची मदत करण्यात सदैव तत्पर असतो. आपला देश कोणत्याही संकटातून जात असताना वेळोवेळी त्याने साथ दिली आहे. त्याचे चित्रपट देखील सामाजिक संदेश देणारे असतात. बघुया खिलाडी कुमारचे लहानपणीचे फोटो.  

शाहरुख खान : बॉलिवूडमधील बादशाह शाहरुख लहानपणापासूनच क्यूट आहे. त्याचे बालपणीचे फोटो अगदी अबरामसारखेच दिसतात.

सलमान खान: दबंग खान लहानपणापासूनच आपल्या डोळ्यांनी बोलताना दिसतो. त्याचे डोळे अतिशय बोलके आहेत. पाहूया त्याचे बालपणीचे फोटो.

रणबीर कपूर : रणबीरचे लहानपणीचे फोटो त्याची आई नितू कपूर नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. रणबीर लहानपणी जितका गोड दिसत होता, आजही तो तितकाच क्यूट दिसतो. पाहा त्याचे बालपणीचे हे दुर्मिळ फोटो.