देशातील रॅप गायकांची धूमशान स्पर्धा, एम टी.व्ही...

देशातील रॅप गायकांची धूमशान स्पर्धा, एम टी.व्ही. वर होणार: रॅप सुप्रिमो बादशाह कऱणार परीक्षण(Rap Supremo Badshah To Judge, The Upcoming New Mtv Rap Show Hustle2.0′)

‘हसल कर, हासिल कर!’ हे बोधवाक्य असलेली नव्या रॅप गायकांची धमाकेदार स्पर्धा एमटीव्ही हसल 2.0 या स्पर्धेचा दुसरा सीझन ३ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. या रॅप रिअॅलिटी टेलिव्हिजन शोच्या नवीन सीझनमध्ये १६ रॅप गायकांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल. ही स्पर्धा १० आठवडे चालणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा रॅप स्चार बादशाह त्यांचा परीक्षक असणार आहे.

या स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत बादशाहने रंगमंचावर नाट्यमय प्रवेश केला व रॅप गीत सादर केले. तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

त्यावेळी ईपीआर, दी एमसी, डिनो जेम्स व किंग चार रॅपर्सनी या शो चे जबरदस्त रॅप सॉंग सादर केले. रॅप प्रेमी व दणकेबाज, ताल धरायला लावणाऱ्या संगीतप्रेमींना हा शो म्हणजे मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.