रणवीर सिंहच्या मते उर्फी जावेद आहे ‘फॅशन ...

रणवीर सिंहच्या मते उर्फी जावेद आहे ‘फॅशन आयकॉन’ ( Ranvir Singh Said Uorfi Javed Is Fashion Icon )

करण जोहरचा सुप्रसिद्ध शो कॉफी विथ करणचा 7 वा सीजन नुकताच सुरु झाला आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी येऊन करणसोबत कॉफी पित त्याच्या प्रश्नांची उत्तरे देतात. या सीजनच्या पहिल्या भागात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह पाहुणे म्हणून आले होते. यावेळी आलिया व रणवीरने त्यांच्या सेक्स लाइफपासून ते प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.

गप्पागोष्टी दरम्यान रणवीरने तो उर्फी जावेदच्या फॅशनचा चाहता असल्याचे सांगितले. शो च्या रॅफिड फायर या खेळात करणने रणवीरला विचारले की, एकच ड्रेस पुन्हा परत घालणे हे कोणाचे वाईट स्वप्न असेल ? त्यावर रणवीरने उर्फी जावेदचे नाव घेतले. रणवीर पुढे म्हणाला की उर्फी फॅशन आयकॉन आहे.

उर्फी जावेद अनेकदा तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. त्यामुळे ती बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा झाली आहे. पण तिला त्याने काहीच फरक पडत नाही. उर्फीने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतल्यामुळे ती अनेकदा स्वत:चे कपडे स्वत:च डिझाइन करते. आता तर उर्फी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत सहभागी झाली आहे.