मधुचंद्राच्या पहिल्या रात्री रणवीर सिंहची हालत ...

मधुचंद्राच्या पहिल्या रात्री रणवीर सिंहची हालत काय झाली होती, हे त्यानेच सांगितले… (Ranveer Singh Was In This Condition On His First Wedding Night : Actor Makes Shocking Revelations)

नेहमीच हंसीमजाक, मौजमस्ती करून लोकांचे मनोरंजन करणारा रणवीर सिंह लोकप्रिय झाला आहे. दीपिका पादुकोणशी लग्न केल्याने तर त्याचा भाव अधिकच वधारला, असं म्हणता येईल. पॅरीसमध्ये तिच्याशी लग्न करून दोघांचा संसार चांगला चालला आहे. मात्र अलिकडेच त्याने लग्नाच्या पहिल्या रात्री आपली काय हालत झाली होती, तसेच आपल्या खासगी जीवनाबद्दल खळबळ जनक खुलासे केले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनमध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट पाहुणे म्हणून आले होते. त्यात त्या दोघांनी आपल्या खासगी जीवनातील खुलासे केले. रणबीरचे तर बिनधास्तपणे  आपल्या लैंगिक जीवनातील गुपिते उलगडून दाखवली.

रणवीर हा बोलायला-चालायला बिनधास्त आहे. तो आपल्या भानगडी सांगायला मागे-पुढे पाहत नाही. ‘कॉफी विथ करण’ मध्ये त्याने असंच मधुचंद्राच्या पहिल्या रात्री आपली काय हालत झाली होती, ती कथन केली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

करण जोहरने रॅपिड फायरमध्ये त्याला मधुचंद्राच्या रात्रीबाबत प्रश्न विचारले. तेव्हा रणवीर म्हणाला की, त्या रात्री मी खूपच उत्साहात व उत्तेजित झालो होतो. या खास रात्रीसाठी त्याने एक सेक्स प्लेलिस्ट देखील बनवली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

त्या रात्री आपण सेक्स केला होता, हे सांगून रणवीरने सांगितले की, त्याने व्हॅनिटी व्हॅनमध्ये पण सेक्स केला होता. लग्नाच्या विधींमुळे तू थकला होतास का? असं विचारल्यावर त्याने ‘नाही’ असं उत्तर दिलं.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी २०१८ साली पॅरीसमध्ये लग्न केलं. हे आपण सारेच जाणून आहोत. या जोडप्याने लग्नाआधी ३-४ वर्षे एकमेकांना डेट केले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

रणवीर सिंह अलिकडेच ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही. कारण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ आणि रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.