जास्तीचे पैसे कमावण्यासाठी रणवीर सिंह विकत होता...

जास्तीचे पैसे कमावण्यासाठी रणवीर सिंह विकत होता बटर चिकन (Ranveer Singh Used To Sell Butter Chicken To Earn Extra Money, You Will Be Stunned To Know)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. रणवीरने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम पात्रे साकारली आहेत, त्यातील अनेक भूमिका अतिशय कौतुकास्पद आहेत. आपल्या प्रत्येक पात्रातून तो प्रेक्षकांच्या मनावर आपली खास छाप पाडतो. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्याने लेखनाची कामेही केली आहेत. इतकंच नाही तर फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तो कॉलेजच्या दिवसातही काम करायचा.

रणवीर सिंगलाही यशाची शिखरे गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. पण त्याने कधीच हार मानली नाही. तो सुरुवातीपासूनच खूप मेहनती आहे. तो संपूर्ण इंडस्ट्रीत आपल्या वेगळ्या आणि खास स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. कॉलेजच्या दिवसांत पैसे कमावण्यासाठी त्याने पार्ट टाइम जॉबपासून ते बटर चिकन विकण्यापर्यंतचे काम केले आहे.

रणवीर सिंहने इंडियाना युनिव्हर्सिटी, यूएसए मधून बॅचलर डिग्री मिळवली आहे, तिथेच त्याने अभिनय आणि थिएटर शिकण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने स्टारबक्समध्ये नोकरीही केली होती. एवढेच नाही तर अतिरिक्त कमाईसाठी तो आपल्या खोलीत बटर चिकन बनवून विकायचा. एकदा रणवीरने स्वतः सांगितले होते की, तो कॉलेजच्या दिवसांमध्ये आपल्या मित्रांकडून काम आणि अभ्यास करुन घेण्यासाठी तो मित्रांसाठी बटर चिकन बनवत  होता.

रणवीरच्या नावापुढे सिंह हे नाव असल्यामुळे तो कपूर कुटुंबाचा नातेवाईक आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. खरेतर रणवीरचे आडनाव भवनानी असे आहे.परंतु आपले नाव छोटे करण्यासाठी त्याने भवनानीच्या ऐवजी सिंह लावण्यास सुरुवात केली. आता त्याला संपूर्ण जर रणवीर सिंह म्हणून ओळखतात.