मॅगझिनसाठी विवस्त्र फोटोशूट केल्यावर रणवीर सिंह...

मॅगझिनसाठी विवस्त्र फोटोशूट केल्यावर रणवीर सिंह म्हणतो हे तर माझ्यासाठी सोप्पे काम.. (Ranveer Singh Opens Up On Posing Nude For Magazine, Says ‘I Can Be Naked In Front Of A Thousand People’)

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अजब फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यासारखी अतरंगी फॅशन इंडस्ट्रीत क्वचितच काहीजण करतात. पण यावेळेस मात्र रणवीरने कपडे न घालताच फोटोशूट केले. त्याच्या विवस्त्र फोटोशूटने सोशल मीडियावर गोंधळ घातला आहे.

रणवीरने हे फोटोशूट प्रिपेर मॅगझीनच्या कव्हरसाठी केले आहे. या फोटोत रणवीरची फिट बॉडी स्पष्ट दिसत आहे. रणवीरने या फोटोत खूप आत्मविश्वासाने पोज दिलेल्या पाहायला मिळतात. काही फोटोत त्याने बसून तर काही फोटोत त्याने उभे राहून त्याच्या शरीराचे प्रदर्शन केले आहे. रणवीरच्या या अनोख्या अंदाजाची चर्चा सर्वत्र होत आहे.

इंटरनॅशनल मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेक सेलिब्रेटींनी मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. भारतात यापूर्वी मिलिंद सोमण यांनी अशा प्रकारचे बोल्ड शूट करुन सर्वत्र गोंधळ निर्माण केला होता.

या मॅगझिनमध्ये रणवीरचा एक इंटरव्ह्यू आहे ज्यात त्याने म्हटले आहे की, माझ्यासाठी फिजिकली न्यूड होणे सोपी गोष्ट आहे. मला न्यूड होण्यास काहीच वाटत नाही. मी हजारो लोकांच्या समोर न्यूड होऊ शकतो. काही लोक नाव ठेवतात पण ते हे नाही करु शकत त्यामुळे त्यांनी स्वत:चा विचार करावा. अनेकजणांना असे करताना अवघडलेपणा येतो.

रणवीरच्या या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. काहीजण या फोटोंना एक धाडसी पाऊल असे म्हणत कौतुक करत आहेत. तर काहीजण या फोटोंना ट्रोल करत आहेत. या फोटोंवर युजर्सच्या मजेशीर कमेंटही येत आहेत.

एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, दीपिकाने रणवीरचे कपडे हिसकावून घेतले आणि कपाटात ठेवून कपाटाला लॉक केले.