दिग्दर्शकानं ‘कट्‌’ म्हटलं तरी रणवी...

दिग्दर्शकानं ‘कट्‌’ म्हटलं तरी रणवीर सिंह, दीपिकाचं चुंबन घेतच राहिला… (Ranveer Singh Kept On Kissing Deepika Padukone Even After Saying Cut)

बॉलिवूडची सर्वाधिक रोमॅन्टिक जोडी आहे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. त्यांची प्रेमकथा सिनेमातील प्रेमकहाणीपेक्षा वेगळी नाहिये. पडद्यामागे प्रत्यक्ष जीवनात नवरा-बायको म्हणून ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. अन्‌ पडद्यावर प्रेमप्रसंग रंगविताना ते असेच रंगून जातात.

संजय लीला भन्साली यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र आले होते. या चित्रपटाचं शूटिंग करतानाच एकमेकांच्या प्रेमात ते पडले.

याच चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा एका तंत्रज्ञाने सांगितला आहे. ‘अंग लगा रे’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान या दोघांचे प्रेम उघडकीस आले. तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या लक्षात आले की, या दोघांचे प्रेमकूजन चालले आहे.

या गाण्यामध्ये चुंबन दृश्य चित्रित केले जात होते. तेव्हा चुंबन घेताना हे दोघे इतके रममाण झाले की, दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी ‘कट्‌’ म्हटले तरी त्यांनी चुंबाचुंबी सुरूच ठेवली. त्यावेळी सेटवर जवळपास ५० जण तरी होते. रणवीर-दीपिकाचा हा अजब रोमान्स पाहून ते सर्वजण स्तब्ध झाले. सेटवर विचित्र शांतता पसरली होती.

त्या तंत्रज्ञाने पुढे असंही सांगितलं की, ”या दोघांचे चांगलेच प्रेमसंबंध जुळले आहेत, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यांचं ते चुंबन खूपच आवेगाचं होतं. कोणी एक शब्दही बोललं नव्हतं. तो प्रसंग मी आजही विसरू शकत नाही.”

” ते दोघे सेटवर एकमेकांना ‘बेबी’ अशी हाक मारायचे. ते एकत्र जेवायचे. आणि त्यांचं शूटिंग नसेल तेव्हा व्हॅनिटी व्हॅन घेऊन हिंडायला निघून जायचे.” या चित्रपटानंतर दोघांनी कित्येक वर्षं एकमेकांना डेट केले आणि अखेरीस लग्न केलं.