दीपिका पादुकोणला चुंबन देत, रणवीर सिंहने केली त...

दीपिका पादुकोणला चुंबन देत, रणवीर सिंहने केली तिच्या अभिनयाची अनोखी तारीफ (Ranveer Singh Is In Awe Of Deepika Padukone’s Performance : Drops A Mushy Post For His Lady Love)

दीपिका आणि रणवीर सिंह ही जोडी पडद्यावर आणि पडद्यामागे देखील चर्चेत राहिली आहे. दीपिकावर प्रेम व्यक्त करण्याची, रणवीरची तऱ्हा नेहमीच निराळी राहिली आहे.

‘गहराईयां’ हा दीपिकाचा चित्रपट ओटीटी मंचावर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील भूमिकेबद्दल दीपिकाची खूप तारीफ होत आहे.

हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून त्यातील गरमागरम दृश्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. मात्र दीपिकाच्या अभिनयाची वारेमाप स्तुती होते आहे. ही संधी रणवीरने सोडली नाही. त्याने आपल्या प्रिय पत्नीची स्तुती, तिला मिठीत घेऊन केली आहे. त्याच्या या वेगळ्या पद्धतीची छायाचित्रे व्हायरल होत आहेत.

एका फोटोत रणवीरने दीपिकाला मिठीत घेऊन तिचे चुंबन घेताना दिसतो आहे. हा फोटो प्रसिद्ध करून तो लिहितो, “एकमेकांत आकंठ बुडूयात. उत्कृष्ट, अगदी मास्टरक्लास अभिनय बेबी! मन हेलावून टाकणारी तुझी कलाकारी… मला तुझा अभिमान वाटतो आहे…”

रणवीरच्या या अनोख्या पोस्टमुळे त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे. यापूर्वी हे दोघे, सोशल मीडियावर दिसले नव्हते.