विमानतळावर रणवीर सिंहचे अचाट धाडस : सर्वांसमक्ष...
विमानतळावर रणवीर सिंहचे अचाट धाडस : सर्वांसमक्ष घेतले दीपिकाचे चुंबन (Ranveer Singh Got Romantic At The Airport, Kissed Deepika In Front Of Everyone)

बॉलिवूड मधील रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukon) यांची जोडी ऑनस्क्रीन अन् ऑफस्क्रीनही लोकप्रिय जोडी आहे. उभयतांमधील बॉन्डिंग पाहून त्यांच्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये, असेच नेहमी चाहत्यांना वाटते. खऱ्या आयुष्यातही रणवीर अतिशय बिनधास्त आणि रोमॅन्टिक स्वभावाचा आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘८३’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे बरेचदा पब्लिक प्लेसवर त्यास स्पॉट केले जात आहे. नुकतेच त्याला विमानतळावर स्पॉट केले गेले असताना नेहमीप्रमाणे रणबीरच्या अचाट धाडसाचं दर्शन झालं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रणवीर आणि दीपिका यांचा खुल्लम खुल्ला प्यार करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रणवीर विमानतळावर सर्वांसमक्ष दीपिकाचे चुंबन घेताना दिसत आहे. एवढंच नाही तर रणवीरचं धाडस पाहून पॅपराजी त्याला वन्स मोअर असे सांगतानाही दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.



रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा ‘८३’ हा आगामी चित्रपट भारताने १९८३ साली क्रिकेटमधील विश्व कप जिंकला, या कथेवर आधारीत आहे. हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर हा कपिल देवच्या भूमिकेत तर दीपिका कपिल देवची पत्नी रोमी यांचे पात्र साकारणार आहे. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम