वाढदिवसानिमित्त अभिनेता रणवीर सिंहने शेअर केला ...

वाढदिवसानिमित्त अभिनेता रणवीर सिंहने शेअर केला शर्टलेस सेल्फी (Ranveer Singh Goes Shirtless And Poses With Messy Hair For A Birthday Selfies)

अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त रणवीर सिंह आपली पत्नी दीपिका पदुकोणसोबत अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दीपिकासोबत वेळ घालवत असतानाच रणवीरला त्याच्या चाहत्यांचा विसर पडलेला नाही. त्याने त्याच्या चाहत्यांसाठी वाढदिवसानिमित्त एक खास सेल्फी पोस्ट केला, ज्यामध्ये तो शर्टलेस आणि विस्कटलेल्या केसांमध्ये दिसत आहे.

हा सेल्फी त्याने अमेरिकेत काढला आहे. सध्या तो आपल्या पत्नीसोबत अमेरिकेत मजा करत आहे. सेल्फीत रणवीर शर्ट काढून पोज देत आहे. ऊनापासून वाचण्यासाठी त्याने डोळ्यांवर सनग्लासेस घातले आहेत. या फोटोत त्याने खांद्यावर बॅग घेतल्याचे सुद्धा दिसते.

रणवीरने हा सेल्फी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून या फोटोला “Peak Me #birthday #selfie Lavv Yewww.” असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या सेल्फीवर त्याच्या चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रेटीसुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोफिया चौधरी, नेहा धूपिया, मौनी रॉय, विक्रांत मेसी या सेलिब्रेटींनी त्याला कमेंटमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 जुलैला रणवीर कॉफी विथ करण 7 च्या पहिल्या भागात पाहुणा म्हणून पाहायला मिळणार आहे.