रणवीर सिंहने सातवीत असताना घेतले पहिल्यांदा चु...

रणवीर सिंहने सातवीत असताना घेतले पहिल्यांदा चुंबन तर वरुण, सिद्धार्थ आणि अनन्याने सांगितल्या त्यांच्या पहिल्या चुंबनाच्या कथा आणि व्यथा (Ranveer Singh Did The First Kiss In The Seventh Class, Varun, Siddharth And Ananya Also Revealed Their First Kiss)

बॉलिवूड कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफसाठी नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. हे कलाकार देखील काही वेळेस त्यांच्या आयुष्याबद्दल बिनधास्त खुलासा करतात. त्यातील काही गोष्टी इतरांना स्फुर्ती देतात. आज या लेखातून आम्ही तुम्हाला बॉलिवूड कलाकारांनी पहिले चुंबन कधी व कोणाचे घेतले याबद्दल सांगणार आहोत. या गोष्टींचा खुलासा स्वत: या कलाकांनीच केला आहे. चला तर जाणून घेऊ रणवीर सिंहपासून अनन्या पांडेचा पहिल्या चुंबनाचा किस्सा

रणवीर सिंह-

आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे आणि सदाबहार अभिनयामुळे नेहमी चर्चेत राहणारा अभिनेता रणवीर नेहमीच कॅमेऱ्यासमोर खुलेआम बोलतो. त्याच्यातला मस्तीखोरपणा प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. रणवीरने एकदा सांगितले की, तो सातवीत असताना त्याने त्याच्याहून दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीचे चुंबन घेतले होते. ती दुसऱ्या शाळेत शिकायची. तिला भेटायला रणवीर त्याचा टेबल टेनिसचा क्लास बंक करुन जायचा.

सिद्धार्थ मल्होत्रा-

सध्याचा बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपर टॅलेंटेड आणि हॅण्डसम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासुद्धा त्याच्या बालपणी प्रेमात पडला होता. याबाबत त्याने स्वत: सांगितले होते की, मी शाळेत असताना प्रेमात पडलो होतो. तेव्हा मी एकीसोबत रिलेशनमध्ये होतो. पण तेव्हा मी त्यात फारसा सीरियस नव्हतो. इयत्ता पाचवीत मी पहिले चुंबन केले होते. आता तर मी माझ्या कामातच इतका व्यस्त असतो की प्रेम करायलासुद्धा माझ्याकडे वेळ नाही.

वरुण धवन –

सध्याचा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता वरुण धवनने देखील त्याच्या पहिल्या चुंबनाचा किस्सा सांगितला होता. वरुण म्हणालेला,” मी तेरा वर्षांचा असताना माझ्याहून एका वर्षाने छोट्या असलेल्या एका मुलीचे चुंबन घेतले होते. मी तुम्हाला तिचे नाव सांगणार नाही कारण एक खरी व्यक्ती चुंबन घेतल्यावर ती कोणाला केले ते नाव कधीच कोणाला सांगत नाही.” वरुणने पुढे सांगितले की, त्या मुलीच्या बिल्डींगच्या पाठीच त्यांनी चुंबन घेतले होते. तेव्हा काय झाले माहित नाही पण, आम्ही एकमेकांशी बोलत होतो. त्याआधी मी टायटॅनिक सिनेमा पाहून आलेलो. भावनेच्या भरात जेव्हा मी तिच्या जवळ गेलो तेव्हा ती म्हणाली की, हे तू काय करतोस आणि अचानक आम्ही चुंबन घेतलं.

अनन्या पांडे –

पहिल्या चुंबनाबाबत अभिनेत्री अनन्या पांडे म्हणाली की, तिने बालपणी कधी कोणाचे चुंबन घेतले  नाही. पण ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2′ या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अभिनेता टायगर श्रॉफचे चुंबन घेतल्याचे तिने सांगितले.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम