बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले रणवीर आणि दीपिका, क...

बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले रणवीर आणि दीपिका, काहींनी केले कौतुक तर काहींनी दीपिकाच्या कपड्यांवरुन केले ट्रोल (Ranveer-Singh-Deepika Padukone Make First Joint Appearance After Long, See Photos And Videos)

नुकतेच मुंबईत जीक्यू मेन ऑफ द इयर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण इंडस्ट्रीतील पॉवरफुल कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बऱ्याच दिवसांनी हे जोडपे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल संध्याकाळी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र दिसले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नव्हते. त्यामुळे ही जोडी अनेकदा सोशल मीडियाच्या चर्चेत होती. दोघांनीही गेले काही दिवस एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया दिली नव्हती.

काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या जीक्यू मॅन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात या जोडप्याने अतिशय स्टायलिश अंदाजात प्रवेश केला. त्यावेळी दीपिकाने लाल इनर-लाल पँट आणि त्यावर एक जुळणारा नॉनफॉर्मल ब्लेझर घातला होता. अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी लाल रंगाचे हाय हिल शूज आणि केसांचा बन बांधला होता.

तर रणवीरने नेव्ही ब्लू रंगाचा नॉनफॉर्मल सूट घातला होता. त्याच्या पॅंटवर ड्रॅगनचे चित्र होते. तर गळ्यात त्याने शर्टवर सोनेरी रंगाची झालर लावली होती.

या अवॉर्ड फंक्शनमध्ये रणवीरला त्याच्या 83 चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अॅक्टर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला. तर अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड एंडोर्समेंटसाठी दीपिकाला ग्लोबल फॅशन पर्सनॅलिटी म्हणून संबोधले गेले.

रणवीर-दीपिकाला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूप खूश झाले. सोशल मीडियावर पापाराझी अकाऊंटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओवर चाहते या जोडप्याचे जोरदार कौतुक करत आहेत. तर काहीजण त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ट्रोल करत आहेत.

दीपिकाच्या कपड्यांबाबत एका वापरकर्त्याने लिहिले, “फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे का.”, आणखी एका चाहत्याने म्हटले की, “आता या दोघांना सगळे जोकर म्हणतील.” एकाने लिहिले, इतके दिवस रणवीर दीपिकाचे कपडे घालायचा आता दीपिका रणवीरचे कपडे घालायला लागली.