रणवीर आणि दीपिकाने खरेदी केले ११९ कोटींचे घर, ब...

रणवीर आणि दीपिकाने खरेदी केले ११९ कोटींचे घर, बनले सलमान-शाहरुखचे शेजारी (Ranveer Singh Buys A Luxurious Quadruplex In Mumbai Worth Rs 119 Crore, Deets Inside)

अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोण यांनी नवीन घर खरेदी केले आहे. हे क्वाड्रप्लेक्स वांद्रे येथे असून सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या घराच्या अगदी जवळ आहे. या अपार्टमेंटची किंमत ११९ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. सध्या त्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांचे अपार्टमेंट हे समुद्रासमोरच असल्यामुळे तेथून समुद्राचे सुंदर दृश्यही दिसते.

रणवीरने खरेदी केलेल्या अपार्टमेंटचा सौदा हा देशातील सर्वात महागड्या सौद्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. टॉवरच्या १६व्या, १७व्या, १८व्या आणि १९व्या मजल्यावर त्याचे अपार्टमेंट आहे. या सौद्यासोबतच रणवीरला १९ पार्किंगच्या जागा देखील मिळाल्या आहेत. त्या भागात प्रति चौरस फूटाचा दर एक लाख रुपये आहे. रणवीरने ११,२६६ चौरस फूट कार्पेट क्षेत्रासह १,३०० चौरस फूट टेरेस देखील खरेदी केले आहे

रणवीरने हे घर ओह फाइव्ह मीडिया वर्क्स एलएलपीच्या माध्यमातून विकत घेतले आहे, रणवीर आणि वडील जुगजीत सुंदर सिंग भवनानी हे त्याचे संचालक आहेत. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला ७.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क दिला.

सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरचे हे आलिशान अपार्टमेंट शाहरुख खानच्या मन्नत आणि सलमानच्या गॅलेक्सीच्या अगदी जवळ असल्यामुळे दीपिका-रणवीर आता या दोन सुपरस्टार्सचे शेजारी होणार आहेत.

रणवीरच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो आलिया भट्टसोबत करण जोहरच्या रॉकी और रानीमध्ये दिसेल. तसेच राहित शेट्टीच्या सर्कसमध्ये सुद्धा दिसेल. याशिवाय तो लवकरच बेअर ग्रिल्ससोबतचा मॅन व्हर्सेस वाइल्डच्या एका भागात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तो आलियासोबत कॉफी विथ करण-७ च्या पहिल्या भागात पाहुणा म्हणून येऊन गेल्यानंतर तेव्हाच्या त्याच्या काही स्पष्ट विधानांमुळे तो चर्चेत आहे.