रणवीर सिंहने जाहिरातीतून ट्रोलर्सना दिले सडतोड ...

रणवीर सिंहने जाहिरातीतून ट्रोलर्सना दिले सडतोड उत्तर,चाहत्यांना आवडला अभिनेत्याचा अनोखा अंदाज (Ranveer Singh Answers Critics In Ad, Says ‘Kuch Logo Ko Mujhse Problem Hai’, Fans Love His Counter To ‘Wagging Tongues’)

रणवीर सिंह  हा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक असून त्याने बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण सध्या त्याच्या करीअरची गाडी कुठेतरी भरकटलेली दिसतेय. त्याचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. अशातच आता त्याची एक नवी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या टीव्ही जाहिरातीत, रणवीर जे त्याच्या कामाला ट्रोल करतात अशा सर्व टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

अलीकडेच रणवीर सिंहची नवीन सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात आली आहे. या जाहिरातीत अभिनेता समीक्षकांना त्याच्याच शैलीत उत्तर देताना दिसत आहे, या टीव्ही जाहिरातीत रणवीर अॅनिमल प्रिंट ब्लू ट्रॅकसूटमध्ये दिसत आहे. रस्त्यावरून चालणारे आजूबाजूचे लोक त्याच्यावर मजेशीर कमेंट करतात, ते रणवीर ऐकून घेतो. आणि सर्वात शेवटी त्यावर आपली प्रतिक्रिया देतो.

जाहिरातीची सुरुवात रणवीर रस्त्याने चालताना होते. चालताना तो म्हणतो- काही लोकांना माझा खूप त्रास होतो. आजूबाजूचे लोक त्याच्याबद्दल बोलतात – हा विदूषकासारखा दिसतो, त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, आजकालची मुलं लक्ष वेधण्यासाठी काहीही फालतू गोष्टी करतात” शेवटी, एक वडील आपल्या मुलाला सांगतात की मनोरंजन ही खरी नोकरी नाही. याच्यासारखं नको बनू. रणवीर त्या मुलाला थांबवतो आणि म्हणतो, “सबका सुनने का, खुद का करने का, तू तेरा कर.”

अभिनेत्याने सोशल मीडियावर ही जाहिरात शेअर केली आहे, त्यासोबत कॅप्शनही लिहिले आहे- जग खाली खेचेल, पण तू पुढे जा, अभिनेत्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते त्याला पाठिंबा देत आहेत. चाहते कमेंटमध्ये लिहित आहेत की – वेल्डन पुढे जा. तर कोणी म्हणत आहे – बॅकग्राउंड स्कोअर – हरलेला गेम आपल्याला जिंकायचा आहे. अभिनेत्याच्या बहुतेक चाहत्यांना त्याने या अंदाजात ट्रोलर्सला दिलेले उत्तर आवडले आहे.

रणवीर सिंहच्या व्यावसायिक जीवनातील यशाचा आलेख खाली येत आहे. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. गेल्या वर्षी त्याचे जयेशभाई जोरदार आणि सर्कस हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते.