आपल्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे रणबीर कपूर...

आपल्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे रणबीर कपूरने जे पसरविले आहे, त्याचा इन्कार करत रणधीर कपूर म्हणतो – मी एकदम ठीक आहे! (Randhir Kapoor Denies Suffering From Dementia, Says I Am Perfectly Fine, Ranbir Can Say What He Wants)

अलीकडेच रणबीर कपूरने एका मुलाखती मध्ये आपले काका रणधीर कपूर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले होते. ते डिमेंशिया या विकाराच्या पहिल्या टप्यावर आहेत, असे तो बोलला होता. त्याचे उदाहरण देताना तो बोलला की, ‘शर्माजी’ हा चित्रपट त्यांना खूप आवडला. अन ते रणबीरचे वडील व आपला छोटा भाऊ ऋषी कपूरची चौकशी करू लागले. ‘तो आहे कुठे? त्याला फोन करूया,’ असं रणधीर बोलल्याचे रणबीरने सांगितले होते.

यावर हसत हसत आपली प्रतिक्रिया रणधीर कपूरने ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, ‘मी एकदम ठीक आहे! मला डिमेंशिया झालेला नाही. गेल्या एप्रिल मध्ये कोविड तेव्हढा झाला होता.’

मग तुझा पुतण्या रणबीर असं कां बोलला? असं विचारताच रणधीर म्हणाला, ‘त्याची मर्जी, काय बोलायचं तो त्याचा अधिकार आहे. ऋषीला फोन लावा वगैरे मी काही बोललो नव्हतो. मी, माझा मित्र राहुल रवैल सोबत गोव्याला गेलो होतो. तिथे गोवा महोत्सवात ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट मी पहिला. मला आवडला. ऋषी आधीपासूनच उत्कृष्ट कलाकार आहे.’