गोमांस संबंधी रणबीर कपूरने केलेले विधान ब्रह्मा...

गोमांस संबंधी रणबीर कपूरने केलेले विधान ब्रह्मास्त्रला ठरु शकतो धोका (Ranbir Kapoor’s Statement About Beef Can Become A Big Problem For The Film Brahmastra)

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांवर बहिष्कार घालण्याच्या मागणीचा जोरदार ट्रेण्ड सुरु आहे.  अनेक मोठे चित्रपट, चित्रपटातील कलाकारांनी किंवा चित्रपट निर्मात्यांनी यापूर्वी केलेली विधाने किंवा इतर काही गोष्टींमुळे प्रेक्षक संतप्त झाले आहेत. मागील काही दिवसांत अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात आले आहेत. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’वरही निशाणा साधला जात आहे. यूजर्स आलिया किंवा रणबीरने केलेल्या जुन्या विधानांचा शोध घेत आहेत. त्यामध्ये त्यांना रणबीरने गोमांस संबधी केलेले एक विधान सापडले. जे आता सोशल मीडियावर खूप ट्रेण्ड होत आहे.

कोणत्याही कलाकाराला स्टार बनवणे हे फक्त जनतेच्या हातात असते, पण जर त्या कलाकारावर प्रेक्षक भडकले तर मग ते त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. असेच काहीसे सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत घडत आहे. रणबीर कपूरशी संबंधित एक व्हिडिओ युजर्सनी शोधून काढला आहे, ज्यामध्ये रणबीरचे बोलणे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये रणबीर सांगत आहे की, त्याला गोमांस खायला आवडते. रणबीरच्या या विधानावरुन प्रेक्षकांच्या रागाचा पारा चांगलाच चढला आहे. ‘ब्रह्मास्त्र’वर सुद्धा बहिष्कार टाकण्याची मागणी ट्विटरवरून जोर धरू लागली आहे.

तर रणबीर आलियाचे चाहते हा चित्रपट हिट करुन दाखवू असे म्हणत असताना ट्रोलर्सनी मात्र हा चित्रपट फ्लॉप करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुऴे रणबीर आलियाच्या चाहत्यांनी  ‘वुई लव आलिया भट्ट और रणबीर हा ट्रेण्ड सुरु केला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. आलिया आणि रणबीरची जोडी ‘ब्रह्मास्त्र’मधून पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.