बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या वाढदिवसाच...

बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन, पाहा फोटोज्‌ (Ranbir Kapoor’s Birthday Party Inside Photos Goes Viral: See Pics)

रणबीर कपूर आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनेक कलाकार रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आज सोशल मीडियावर रणबीर ट्रेंड करत आहे. सोबतच त्याच्या ग्रँड बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी रणबीर कपूर आपलं कुटुंब आणि गर्लफ्रेंड आलिया भट्ट सोबत आधीच जोधपूरला गेला आहे. तेथून त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.

Ranbir Kapoor’s Birthday Party
Ranbir Kapoor’s Birthday Party

रणबीर कपूरला बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. कपूर कुटुंबातील या अभिनेत्याने तरुणींना भुरळ घातली आहे. रणबीरच्या फोटोंवर  फिदा होत चाहतेही त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. रणबीर ऑल ब्लॅक अटायर मध्ये अतिशय हँडसम दिसत आहे. त्याने एक नाही तर तीन केक कापले आहेत. आणि हे सर्व केक्स त्याची भावी वधू आलियाने सजविलेले आहेत. हे करत असताना आलियाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

Ranbir Kapoor’s Birthday Party
Ranbir Kapoor’s Birthday Party

जोधपूर येथील एका रिसॉर्टमध्ये रणबीर आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करत असून संपूर्ण रिसॉर्टला रोषणाई करण्यात आली आहे. रणबीरची आई नीतू कपूर, ताई  रिद्धिमा आणि सासू सोनी राजदान सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अन्‌ त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Ranbir Kapoor’s Birthday Party
Ranbir Kapoor’s Birthday Party

रणबीर आणि आलिया लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे एवढेच ननव्हे तर लग्नासाठीचे डेस्टिनेशन शोधण्यासाठीच ते दोघे जोधपूरला गेले असल्याचेही म्हटले जात आहे.