रणबीरने संपूर्ण कपूर खानदानात एकट्याने १० वी उत...

रणबीरने संपूर्ण कपूर खानदानात एकट्याने १० वी उतीर्ण करुन दाखवल्यामुळे कपूर कुटुंबियांनी दिली होती जंगी पार्टी ( Ranbir Kapoor Was The Only Member To Pass Out 10th Standard Exam In Kapoor Khandan: His Success Was Celebrated With A Party )

अभिनेता रणबीर कपूरच्या आधीच्या चारही पिढ्या चित्रपट सृष्टीतीलच भाग होत्या. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत त्या तेवढ्या सरस नसल्याचे रणबीरने एका मुलाखतीत सांगितले. रणबीरचे पणजोबा पृथ्वीराज कपूर, आजोबा राज कपूर, वडील ऋषी कपूर आणि इतर अनेक नातेवाईक हे सिनेइंडस्ट्रीतील नामवंत कलाकार आहेत. 

घरातूनच अभिनयाचं बाळकडू पाजलं गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा अभिनयात तरबेज पण अभ्यासात मात्र मागे होते. रणबीर हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणारा कपूर कुटुंबातील पहिला मुलगा असल्याचा त्याने नुकताच खुलासा केला. मुलाखतीत रणबीरने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या एका मुलाखतीत रणबीरला विचारले की १० वी पास झाल्यावर त्याने गणित आणि विज्ञान यांपैकी कोणता विषय घेतला होता ? यावर रणबीरने गणित असे उत्तर दिले. त्यानंतर तो अभ्यासात कमजोर होता का असे विचारले त्यावर त्या हो मी खूप कमजोर होतो असे सांगितले.

रणबीरला दहावीत किती गुण मिळाले होते असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने सांगितले की , मला ५३.४ टक्के मिळाले होते. खरेतर हे मार्क खूप कमी होते पण जेव्हा माझा निकाल लागला तेव्हा माझं सगळं कुटुंब खूप खुश झालं कारण त्यांना मी पास होईन याची आशाच नव्हती. मी माझ्या कुटुंबातील पहिलाच १० वी उतीर्ण होणारा मुलगा आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मोठी पार्टी ठेवली होती.

रणबीरचे चार वर्षांनी दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याचे चाहते खूप खुश आहे. सध्या तो त्याच्या शमशेरा चित्रपटाचे प्रमोशन सर्वत्र करत आहे.