दीपिका पादुकोणला पाहताक्षणीच रणबीर कपूर तिच्या ...

दीपिका पादुकोणला पाहताक्षणीच रणबीर कपूर तिच्या प्रेमात पडला… त्याच दिवशी तिचा फोन नंबर शोधून काढला… (Ranbir Kapoor Was Blown Away After Seeing Deepika Padukone, Found The Phone Number On The Same Day)

एक काळ होता जेव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोणच्या सौंदर्याने रणबीर कपूरला वेडे केले होते आणि दीपिकाही रणबीरच्या प्रेमात होती. जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली देत, अभिनेत्रीने स्वतःच्या गळ्यावर रणबीरच्या नावाचा टॅटूही बनवून घेतला होता, जो मीडियाच्या नजरेतूनही चुकला नव्हता. चाहत्यांनीही या जोडप्याला पसंती दर्शवली होती. पण कुठे माशी शिंकली माहीत नाही अन्‌ हळूहळू दोघांमध्ये दुरावा येत गेला अन्‌ सगळंच फिसकटलं.

Ranbir Kapoor, Deepika Padukone

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दोघांमधील ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही त्यावेळेस बऱ्याच चर्चिल्या गेल्या. पण त्यांच्यातील प्रेम कधी आणि कसे सुरू झाले हे तुम्हाला माहिती आहे का? एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या रणबीर आणि दीपिकामध्ये दुरावा का आला? दोघांपैकी कोण कोणाच्या आधी प्रेमात पडले?, रणबीरने दीपिकाला पहिल्यांदा कुठे पाहिले? हे सर्व जाणून घेण्यासाठी सुरुवातीपासून त्यांची प्रेमकहानी जाणून घेऊया. ती देखील रणबीर कपूरने स्वतः सांगितली होती.

Ranbir Kapoor, Deepika Padukone

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

रणबीर कपूर प्रथम दर्शनीच दीपिका पादुकोणसाठी वेडा झाला होता, हे फारसं कोणाला माहीत नसेल. एवढेच नाही तर या प्रेमवीराला त्याच दिवशी दीपिकाचा मोबाईल नंबरही सापडला होता. याचा उल्लेख रणबीर कपूरने स्वतः एका मुलाखती दरम्यान केला होता. रणबीर म्हणाला होता की, त्याने दीपिकाला ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदा पाहिले. त्या वेळेस रणबीर त्याच्या पहिल्या ‘सावरिया’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याचवेळी, दीपिका जेवणाच्या वेळी तिच्या व्हॅनिटी व्हॅनकडे जात होती आणि रणबीर बाहेर उभा होता. त्याच क्षणी रणबीरने दीपिकाला पहिल्यांदा पाहिले आणि तो आपलं हृदय हरवून बसला.

Ranbir Kapoor, Deepika Padukone

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

पुढे रणबीरने सांगितले की,’त्यावेळेस दीपिकाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नव्हते. परंतु प्रेमात पडलेल्या रणबीरला त्याच दिवशी दीपिकाचा फोन नंबर सापडला आणि त्याने ताबडतोब दीपिकाला फोनही केला होता, त्यानंतर दोघांच्या भेटी सुरू झाल्या, पुढे भेटी वाढू लागल्या. अन्‌ दीपिकालाही रणबीर आवडू लागला होता. दोघेही जवळजवळ दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दोघांमधील अंतर वाढतच गेले आणि शेवटी त्यांचा ब्रेकअप झाला.

दीपिका पदुकोण म्हणाली की, रणबीरने तिला फसवले. असे म्हटले जाते की, ‘राजनीती’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, रणबीर कपूरची कतरिना कैफशी जवळीक खूप वाढली होती, ज्यामुळे दीपिकाला रणबीरसोबत ब्रेकअप करणेच योग्य वाटले.

Ranbir Kapoor, Deepika Padukone

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

एका मुलाखती दरम्यान, रणबीर कपूरचे नाव न घेता, दीपिका पदुकोण म्हणाली, “मी वेडी होते त्यामुळे मी त्याला दुसरी संधी दिली. तो माझ्या समोर विनवणी करत होता. त्यावेळेस तो फक्त तुझी फसवणूक करत आहे, असे सांगत लोकांनी मला वारंवार समजावले होते पण मी त्या लोकांचे कधीही ऐकले नाही. पण मग एके दिवशी मी त्याला रंगेहाथ पकडले. या सगळ्याचा मला खूप त्रास झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ लागला, पण नंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आज दीपिका पादुकोण रणवीर सिंगसोबत तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. रणवीर सिंह देखील दीपिकाच्या प्रेमात पडला, पण त्याचे प्रेम खूप गंभीर होते, ज्यामुळे त्याने दीपिकाशी लवकरच लग्न केले. तर दुसरीकडे रणबीर कपूर देखील आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत, ज्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.