शमशेराच्या शूटिंग दरम्यान रणबीर करायचा तब्बल २०...

शमशेराच्या शूटिंग दरम्यान रणबीर करायचा तब्बल २० वेळा अंघोळ, दिग्दर्शकालाही हासडायचा शिव्या (Ranbir Kapoor Used to Take Bath 20 Times a Day During Shooting of ‘Shamshera’, Used to Abuse Director Too)

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरसाठी हे वर्ष म्हणजे दुग्धशर्करा योग असे ठरले आहे.  एकीकडे तो लवकरच बाबा होणार आहे, तर दुसरीकडे त्याच्या ‘शमशेरा’ आणि ब्रम्हास्त्र हे दोन बिग बजेट चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे तो सध्या खूप चर्चेत आहे. रणबीर कपूर सध्या शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीर ऐतिहासिक पात्र साकारणार असून तो पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणबीर सतत चित्रपटाशी संबंधित रंजक गोष्टी शेअर करत असतो. तसेच रणबीरने एका मुलाखतीत सांगितले की, शमशेराच्या शूटिंग दरम्यान त्याला दिवसातून 20 वेळा आंघोळ करावी लागत होती. त्यामुळे तो मनापासून दिग्दर्शकाला शिव्या घालायचा.

शमशेरा या चित्रपटात रणबीर कपूरसोबत संजय दत्त आणि वाणी कपूर सुद्धा दिसणार आहे. रणबीरने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली असून त्यात तो डाकूची भूमिकाही करणार आहे. रणबीरला याप्रकारची भूमिका करण्याची इच्छा खूप आधीपासून होती.

मुलाखतीत, अभिनेत्याने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक मजेदार किस्सा सांगितला, रणबीर म्हणाला की, शूटिंगसाठी निर्माते दररोज 10 ते 15 किलो धूळ सेटवर ठेवायचे आणि शूटिंग सुरू होताच धूळ उडवायचे. शूटिंगच्या वेळी धूळ आणि माती आमच्या कानात, डोळ्यात आणि तोंडात जायची. कधी कधी इतकी हालत खराब व्हायची की आम्हाला संवादही बोलता येत नव्हते. अशा वेळी शरीरातील धूळ पूर्णपणे साफ करण्यासाठी शूटिंगवरुन घरी गेल्यानंतर किमान 20 वेळा आंघोळ करावी लागायची.

सेटवर सतत धूळ उडवली जात असल्यामुळे रणबीर खूप चिडचिडा झालेला तेव्हा तो मनातल्या मनात निर्मात्याला शिव्या घालायचा असे तो म्हणाला.

या चित्रपटासाठी रणबीर आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. भलेही त्याने मनातल्या मनात निर्माता दिग्दर्शकांना शिव्या घातल्या असल्या तरी त्यांनी केलेली मेहनत स्क्रीनवर पाहून तो खूप खुश झाला आहे.