रणबीरच्या लहानपणीच्या करामतींमुळे नीतू कपूर झाल...

रणबीरच्या लहानपणीच्या करामतींमुळे नीतू कपूर झाल्या होत्या खजिल (Ranbir Kapoor Used to do this After Seeing Teacher in Short Skirt, Mom Neetu Also Embarrassed by Son’s Act)

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आता नवरा-बाप झाला असला तरी त्याच्या खोडसाळपणाचे आणि अफेअर्सचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. आलियासोबत लग्न करण्यापूर्वी कतरीना कैफ आणि दीपिका पादुकोणला डेट करण्याव्यतिरिक्त रणबीरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. रणबीर लहानपणी इतका खोडकर होता की त्याच्या वागण्यामुळे अनेकदा त्याच्या आई-वडिलांना लाजिरवाणे व्हावे लागले. विशेषत: शालेय दिवसांमध्ये रणबीरने आपल्या पालकांना शरमेने अनेकदा मान खाली घालायला लावली होती.  

रणबीर कपूर लहानपणी खूप खोडकर होता. रजत शर्माने ‘आप की अदालत’ या शोमध्ये त्याच्या बालपणातील खोड्यांसंबंधित एक किस्सा उघड केला. शोमध्ये त्याने रणबीरला विचारले की तू आपल्या टीचरचा स्कर्ट उचलून पाहिला आहे का?

रजत शर्माच्या प्रश्नाला उत्तर देताना रणबीर म्हणाला होता की नाही, असे नव्हते. अभिनेत्याने सांगितले की ती त्याची पहिली वर्ग शिक्षिका होती जी एक ख्रिश्चन महिला होती. शाळेतील इतर सर्व शिक्षक साडी नेसून यायच्या, पण ख्रिश्चन शिक्षक स्कर्ट घालून यायच्या.

तो म्हणाला की मी खूपच लहान होता आणि माझे वय सुमारे 4 वर्षे असेल. त्या काळात वर्ग सुरू असताना शिक्षकांचे टेबल खूप उंच होते. टिचर तिच्या टेबलाशेजारील खुर्चीवर बसायची तेव्हा त्यांचे पाय दिसायचे.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, माझा एक मित्र होता जो माझ्यापेक्षा जास्त खोडकर होता आणि तो मला शिक्षकांचे पाय पाहण्यासाठी प्रोत्साहित करायचा, म्हणून मी माझ्या मित्रासोबत बसून टिचरच्या पायांकडे पाहायचो. रणबीर पुढे म्हणाला की, मी फक्त लहान स्कर्ट घातलेल्या टिचरचे पाय पाहिले आहेत, त्यांच्या स्कर्टला कधीही स्पर्श केला नाही.

रणबीरच्या या कृत्यांमुळे त्याची आई नीतू कपूर यांना लाजिरवाणे व्हावे लागले होते. रणबीरच्या या कृत्यांमुळे त्याची आई नीतू कपूर यांना शाळेतून फोन आला आणि मुलाचे हे कारनामे समजल्यानंतर त्या खूपच खजिल झाल्या होत्या.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ‘तू झुठी में मक्कर’साठी चर्चेत आहे. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला.  या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसली. येत्या काळात रणबीर ‘अंदाज अपना अपना 2’, ‘डेविल’, ‘एनिमल’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.