रणबीर कपूरची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह? काका रणधीर...

रणबीर कपूरची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह? काका रणधीर कपूर यावर काय म्हणाले? (Ranbir Kapoor Tests COVID Positive? Know What Uncle Randhir Kapoor Has to Say)

कपूर परिवाराकडून एका मागोमाग एक चिंताजनक बातम्या येत आहेत. आजच अभिनेता रणबीर कपूर आजारी असल्याचे कळले आहे. आई नीतू कपूर नंतर त्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला असून तो सध्या क्वारंटाईन झाला आहे आणि घरीच आराम करत आहे, असे सांगितले जात आहे.

कमबॅक करण्याच्या तयारीत बिझी आहे रणबीर
बऱ्याच दिवसांनंतर रणबीर कपूर आपल्या आगामी चित्रपटांच्या तयारीत बिझी आहे. अलिकडेच आलिया भट्टच्या ‘ब्रह्मस्त्र’ चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूरला पाहिले गेले होते. दरम्यान रणबीर कपूरची कोरोना-१९ ची चाचणी सकारात्मक आली असल्याचे कळले असून त्याचे काका रणधीर कपूर यांनी या बातमीस दुजोरा दिला आहे.

रणधीर कपूर यांनी सांगितले सत्य
रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी या बातमीला दुजोरा देत असे म्हटले आहे की, रणबीर आजारी आहे, परंतु त्याला नक्की काय झाले आहे, ते मला माहीत नाही. सध्या मी शहराबाहेर आहे. मला असं कळविण्यात आलं आहे की रणबीरची तब्येत ठीक नसून तो घरीच क्वारंटाईन झालेला आहे आणि आराम करत आहे. रणबीरची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे त्याच्या फॅन्सची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर देखील ही बातमी व्हायरल होत आहे.  

काही दिवसांपूर्वीत दिल्लीहून शूटिंग करून परतलेला रणबीर
काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी दिल्लीला गेला होता आणि शुटिंग पूर्ण करून मुंबईला परतला होता. मुंबईला आल्यानंतर त्याने गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबतही एका जाहिरातीचं शुटिंग केलं. या शुटिंगनंतर त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर तपासणी करायला गेल्यावर आपल्याला कोरोना झाल्याचे त्याला कळले आणि म्हणूनच त्याने स्वतःला क्वारंटाईन केले आहे.

नीतू कपूर यांनाही झाला होता कोरोना
डिसेंबर २०२० मध्ये रणबीरची आई नीतूजी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी चंदिगढला गेल्या असताना तेथेच त्यांना कोरोनोचा संसर्ग झाला होता. ज्यामुळे त्यांना ॲम्ब्युलन्समधूनच मुंबईला आणण्यात आलं होतं.