रणबीर कपूरला लहान वयात सिगरेट पिताना पाहून नीतू...

रणबीर कपूरला लहान वयात सिगरेट पिताना पाहून नीतू कपूरची अशी होती प्रतिक्रिया(Ranbir Kapoor Started Smoking at a Very Young Age, Neetu Kapoor reacted Like This After caught him Red Handed)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाचे कलाकार गेले काही दिवस सतत प्रमोशन करत होते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी देखील शेअर केल्या, त्यापैकी एक म्हणजे सिगारेटच्या व्यसनाशी संबंधित होती.

अभिनेत्याने नुकतेच सांगितले की त्याला लहान वयातच सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते. तसेच त्याच्या आईने पहिल्यांदा सिगारेट ओढताना पाहिल्यावर त्यांची प्रतिक्रिया कशी होती हे देखील सांगितले.अलीकडेच, रणबीर कपूरने आपल्या ‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खुलासा केला की, त्याने लहान वयातच धूम्रपान करण्यास सुरुवात केली होती.

सिगारेट ओढताना आई नीतू कपूर हिने आपल्याला रंगेहात पकडले तेव्हा हालत फार खराब झाली.अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, आई नीतू कपूर जेव्हा मला धूम्रपान करताना पहिले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले की आपला मुलगा इतक्या लहान वयात सिगारेट ओढत होता. तिचा विश्वासच बसत नव्हता. अभिनेत्याने सांगितले की, माझे हे कृत्य पाहून ती भावनिकरित्या तुटली.

आरजे सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने लहानपणी पहिल्यांदा धूम्रपान करताना पकडल्यावर आपल्या आईची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा केला. अभिनेत्याने सांगितले की,मी त्या आधी आईला इतके भावनिकरित्या तुटलेले यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. जेव्हा माझ्या आईला सिगारेट ओढण्याच्या माझ्या व्यसनाची माहिती मिळाली तेव्हा तिच्या आयुष्यातील तो खूप वाईट काळ होता. सिगारेट ओढताना रंगेहात पकडले जाणे आणि आईला त्याबद्दल कळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता, कारण त्या घटनेनंतर माझी आई खूप उदास झाली होती.

मी त्याआधी आईला इतके दुःखी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.रणबीरने मुलाखतीत पुढे सांगितले की, आईला खूप वाईट वाटल्यामुळे मी माझ्या कृत्याबद्दल माफी मागितली. शेवटी, पालक आपल्या मुलांच्या चुका माफ करतात आणि आईनेही मला माफ केले.

‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास,८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट लव रंजनने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेता लवकरच ‘अॅनिमल’, ‘डेविल’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.