रणबीर कपूरचे 8 नंबरसोबत काय आहे नाते, स्वत: अभि...
रणबीर कपूरचे 8 नंबरसोबत काय आहे नाते, स्वत: अभिनेत्याने केला खुलासा (Ranbir Kapoor Reveals First Gift He Gave Daughter Raha And Its Connection To His Favourite Number 8)

अभिनेता रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने आपल्या लाडक्या लेकीला पहिली भेटवस्तू काय दिली ते सांगितले. तसेच अभिनेत्याने या भेटवस्तूचा आपला आवडता क्रमांक 8 शी काय संबंध आहे हे देखील सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कर’ आज सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. प्रमोशनदरम्यान मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने मुलगी राहा कपूरबद्दल मोकळेपणाने अनेक गोष्टी सांगितल्या.

मुलाखतीदरम्यान, अभिनेता राहा कपूरच्या पहिल्या फोटोबद्दल बोलला. त्याने मुलगी राहा हिला दिलेली पहिली भेट आणि याशिवाय या भेटवस्तूचा आपल्या आवडत्या 8 या क्रमांकशी काय संबंध आहे हेदेखील सांगितले. याशिवाय अभिनेत्याने मीडियासमोर आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला.
ETimes शी बोलताना रणबीरने सांगितले की रणबीर कपूरचा आवडता नंबर 8 आहे. आई नीतू कपूरचा वाढदिवस देखील 8 जुलै रोजी येतो. मुलगी राहाला दिलेली पहिली भेट देखील 8 क्रमांकाशी संबंधित आहे. मुलाखतीदरम्यान, जेव्हा रणबीरला विचारण्यात आले की त्याने आपल्या मुलीला दिलेली पहिली भेट कोणती होती?
तर त्याने उत्तर दिले की- नायके स्नीकर आणि बार्सिलोना जर्सी. जी तिच्या नावासह त्यावर 8 क्रमांक प्रिंट केलेली होती. आलिया भट्टने राहाची मिनी बार्सिलोना जर्सी फ्रेम करून आपल्या मुंबईतील घराच्या भिंतीवर लावली आहे. आलियाने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुलाखतीदरम्यान, जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की आलिया – सोनी राजदान, नीतू कपूर, शाहीन भट्ट यांच्यानंतर राहाला कुशीत घेणारा कुटुंबातील पहिला सदस्य कोण होता. तर रणबीर म्हणाला – या तिघांपैकी एकतर सोनी आंटी होती किंवा माझी आई किंवा शाहीन. मला नक्की आठवत नाही कारण सगळं तसं होतं. पण त्या तिघांमध्ये मी होतो.