नीतू कपूरसोबत रणबीर कपूरने केले गणपतीचे विसर्जन...

नीतू कपूरसोबत रणबीर कपूरने केले गणपतीचे विसर्जन, अभिनेत्याचा आरती करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Ranbir Kapoor Performs Ganpati Visarjan In Mumbai With Mom Neetu Kapoor, Watch Viral Video)

सध्या सर्वत्र गणेश विसर्जन मोठ्या वाजतगाजत होत आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानपासून सोनू सूद, शिल्पा शेट्टी आणि अर्पिता खान शर्मापर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले. आणि आता ते धूमधडाक्यात बाप्पाचे विसर्जन सुध्दा करत आहेत. नुकताच अभिनेता रणबीर कपूर आपली आई नीतू कपूरसोबत गणेश विसर्जन करताना दिसला.

अभिनेत्याच्या गणेश विसर्जनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पापाराझींच्या अकाउंटवरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता रणबीर कपूर गणेश विसर्जन दरम्यान गणपतीची आरती आणि इतर विधी करताना दिसत आहे. पूजेदरम्यान त्याची आई नीतू कपूरही अभिनेत्यासोबत दिसत आहे.या व्हिडिओमध्ये रणबीरने काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत. तसेच त्याने काळ्या रंगाची टोपीही घातली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याने मास्कही घातला आहे.

तर नीतू कपूरने निळ्या रंगाची कुर्ती परिधान केली होती. पूजेदरम्यान नीतू कपूर अतिशय साध्या आणि आकर्षक दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दोघे आरती करताना दिसत आहेत.रणबीर कपूर सध्या आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रह्मास्त्रच्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्टही मुख्य भूमिकेत आहे. रणबीर आणि आलियाचा हा पहिलाच चित्रपट असून त्यात त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

या चित्रपटात रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील दिसणार आहेत.नीतू कपूर नुकत्याच ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि मनीष पॉल होते.