रणबीर कपूर म्हणतो आलिया माझ्या वरणभाताची फोडणी ...

रणबीर कपूर म्हणतो आलिया माझ्या वरणभाताची फोडणी आहे…(Ranbir Kapoor on marriage to Alia Bhatt: ‘Life mein ab keema pav, tangdi kabab, hakka noodle ki zarurat nahi, Dal Chawal is best’)

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नामुळे त्यांचे चाहते सुखावले आहेत. त्यांच्या आयुष्यात काय घडते हे जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. रणबीरची आई नीतू कपूर तर आलियाबद्दल बोलताना थकत नाही. पण लग्नाला 2 महिने उलटूनही रणबीरने आलियाबद्दल कोणतेच विधान न केल्याने चाहते थोडे नाराज होते. पण शमशेराच्या ट्रेलर लॉन्चिंग वेळी रणबीर पहिल्यांदा आलियाबद्दल बोलला.

रणबीर सध्या त्याच्या ब्रम्हास्त्र आणि शमशेरा या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याच्या दोन्ही चित्रपटाच्या ट्रेलरला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हे वर्ष रणबीरच्या नावावर असेल असेच वाटते. ट्रेलर लॉन्चवेळी रणबीर आलियाबद्दल बोलण्यात तल्लीन झालेला. त्याच्या बोलण्यावरुन तरी तो लग्नानंतर खूप बदलला आहे असेच वाटते.

रणबीर म्हणाला की, लग्नानंतर त्याच्या आयुष्यात कोणत्याच गर्लफ्रेंडला प्रवेश नाही. हे माझ्यासाठी एक महत्वाचे वर्ष आहे. कारण यावर्षी चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच माझे लग्न सुद्धा झाले आहे. लग्न हे माझ्या आयुष्यातील खूप सुंदर गोष्ट आहे. मी माझ्या चित्रपटात बरेचदा बोललोय की, लग्न हे वरण भाताप्रमाणे असते जे 50 वर्षांसाठी असते किंवा जोपर्यंत तुम्ही मरत नाही. लाइफमध्ये कबाब, तंगडी, खिमा पाव, हक्का नुडल्स असावेत पण आयुष्याच्या भल्यासाठी वरण भातच बेस्ट आहे बाकी काही नाही.

त्यानंतर आलियावरचे प्रेम व्यक्त करत म्हटले की , आलिया माझ्यासाठी वरण भातावरची फोडणी आहे. तसेच त्यासोबतचे लोणचं, कांदा आहे. ती सगळं काही आहे. माझ्य़ासाठी तिच्यापेक्षा चांगली लाइफ पार्टनर असूच शकत नाही.

आलियाबद्दल बोलताना रणबीर मध्येच लाजत होता. रणबीरचा तो व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरच्या आईने एका मुलाखतीत सांगितलेले की रणबीर खूप बदलला आहे आणि खूप चांगला माणूस झाला आहे.